ETV Bharat / sitara

यश चोप्रा फाऊंडेशन कडून दैनंदिन मजुरांना मिळणार मदतीचा हात - yash raj chopra foundation latest news

यश चोप्रा फाऊंडेशन कडून प्रत्येक दैनंदिन मजुराच्या बँक खात्यात 5000 रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

yash raj chopra foundation help daily wages worker
यश चोप्रा फाऊंडेशन कडून दैनंदिन मजुरांना मिळणार मदतीचा हात
author img

By

Published : Apr 4, 2020, 12:48 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूसोबत लढण्यासाठी आर्थिक मदत घेऊन बरेच कलाकार समोर आले आहेत. आत्तापर्यंत बऱ्याच कलाकारांनी शक्य होईल तेवढी मदत केली आहे. तसेच, दैनंदिन काम करणाऱ्या मजुरांना देखील मदतीचा हात दिला आहे. आता यश चोप्रा फाऊंडेशन कडून देखील मजुरांना मदत केली जाणार आहे.

यश चोप्रा फाऊंडेशन कडून प्रत्येक दैनंदिन मजुराच्या बँक खात्यात 5000 रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या फाऊंडेशन अंतर्गत जवळपास 3000 मजुरांना मदत मिळणार असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

यामध्ये महिला कलाकार संघाचे 250 सदस्य, ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएट संघाचे 250 सदस्य, फिल्म स्टूडियोज सेटिंग आणि मजदूर संघाचे 2500 सदस्य यांचा समावेश आहे. यामुळे अनेक मजुरांना आर्थिक सहाय्य मिळेल.

yash raj chopra foundation help daily wages worker
यश चोप्रा फाऊंडेशन कडून दैनंदिन मजुरांना मिळणार मदतीचा हात
लॉक डाऊनमुळे चित्रपट, मालिका सर्व कार्यक्रमाचे शूटिंग रद्द झाले आहे. त्यामुळे यामध्ये काम करणारे हजारो मजूर बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट आले आहे. त्यांच्या मदतीसाठी आत्तापर्यंत सलमान खान, शाहरुख खान, अजय देवगन आणि रोहित शेट्टी हे सेलिब्रिटी पुढे आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.