मुंबई - अभिनेत्री भूमी पेडणेकर आपल्या आगामी 'दुर्गावती' चित्रपटासाठी कंबर कसून सज्ज झाली आहे. तिच्यासाठी या चित्रपटाच्या शूटिंगची प्रतीक्षा एका बाजूला उत्साहित करणारी आहे तर दुसऱ्या बाजूला पोटात भीतीचा गोळा आणणारी आहे. कारण पहिल्यांदाच ती चित्रपटात एकमेव स्टार आहे.
भूमी म्हणाली, "मी पहिल्यांदाच एकटी चित्रपटाचे शूटिंग करीत आहे आणि ते रोमांचक तर आहेच पण त्रासदायक देखील आहे. माझ्यावर खूप जबाबदारी आहे."
एका भय चित्रपटात कास्ट केल्याबद्दल ती म्हणाली, "माझी जबाबदारी शेअर करण्यासाठी नेहमीच माझ्यासोबत एक सह-कलाकार असतो. आता या चित्रपटात मी एकटी आहे. यावर लोक काय प्रतिसाद देतात हे पाहायला मी खूप उत्सुक आहे. मी कधी असे पाहिलेले नाही. लोकांनी मला कधी अशा अवतारात पाहिलेले नाही.''
भूमी 'बधाई दो' चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करण्यासाठी तयार आहे. हा चित्रपट आयुष्मान खुरानाची भूमिका असलेल्या ‘बधाई हो’ चा दुसरा भाग आहे. यापूर्वी आयुष्मान आणि भूमी यांनी 'दम लगा के हैशा', 'शुभ मंगल सावधान' आणि 'बाला' सारख्या हिट चित्रपटात काम केले आहे.