मुंबई - 'धडक' गर्ल जान्हवीला बॉलिवूड सेलेब्सनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज जान्हवी आपला २३ वा वाढदिवस साजरा करीत आहे.
अभिनेत्री सोनम कपूरने जान्हवीला इन्स्टाग्रामवरून शुभेच्छा दिल्यात. तिने एक फोटो पोस्ट केला असून यात ती जान्हवीसोबत पोज देताना दिसत आहे. याच्या कॅप्शनमध्ये तिने 'हॅप्पी बर्थ डे' असे लिहिलंय.
आपल्या इन्स्टाग्रामवर जान्हवीचा सोलो फोटो शेअर करीत सोनमने लिहिलंय, ''मी तुझे बालपण पाहिले आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत एक शानदार महिला बनण्याचा प्रवास पाहिलाय. तू माझ्यासाठी किती खास आहे हे शब्दात सांगू शकत नाही. लव्ह यू.''
फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने जान्हवीचा फोटो शेअर केला आहे. यात तिने लहंगा परिधान केला आहे. तिच्या भावी आयुष्यासाठी त्याने शुभेच्छा दिल्या आहेत. जान्हवीचे काका अनिल कपूर यांनी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये जान्हवीसोबतचा फॅशन स्टेजचा फोटो शेअर करीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
जान्हवी कपूरने 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता ती 'गुंजन सक्सेनाः द कारगिल गर्ल' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. शरण शर्मा दिग्दर्शन करीत असलेल्या या चित्रपटात पंकज त्रिपाठी, विनीत कुमार सिंह, अंगद बेदी और मानव विज हे काम करत आहेत.