ETV Bharat / sitara

आर्यन खानला 'कस्टडी'त भेटणारी, 'सुटके'साठी तळमळणारी, कोण आहे ही 'भावूक' होणारी पूजा? - आर्यन खानला 'कस्टडी'त भेटणारी पूजा ददलानी

आर्यन खानला अटक झाल्यानंतर शाहरुख किंवा गौरी खान त्याच्या भेटीस आलेल्या नाहीत. एनसीबीच्या चौकशी दरम्यान आर्यन म्हणाला होता की त्याला वडिलांची भेट घ्यायची असेल तर अपॉईंटमेंट घ्यावी लागते. मात्र एक व्यक्ती आर्यनला धीर देताना, भेटीगाठी करताना, न्यायालयात भावूक होताना दिसते, ती आहे पूजा ददलानी. कोण आहे ही पूजा आणि तिचा आर्यन आणि खान कुटुंबाशी काय संबंध आहेत हे जाणून घेऊयात...

खान कुटुंबाची विश्वासू पूजा
खान कुटुंबाची विश्वासू पूजा
author img

By

Published : Oct 9, 2021, 6:24 PM IST

मुंबई - 3 ऑक्टोबर रोजी गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावर ड्रग छापा टाकून नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यन खान आणि इतर सात जणांना अटक केली होती. त्यानंतर आर्यनला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. आर्यन खान याची मुंबई फोर्ट कोर्टाने क्रूज ड्रग्स प्रकरणात दाखल केलेली जामीन याचिका शुक्रवारी फेटाळली. आर्यन खानला आता आर्थर रोड जेलमध्ये राहावे लागेल. अशा परिस्थितीत आता आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करणार आहेत.

जामीन नाकारल्यानंतर भावूक झाली होती पूजा

दरम्यान, आर्यनचे आई -वडील शाहरुख खान आणि गौरी खान यांनी अद्याप कोणतीही सार्वजनिक ठिकाणावर हजेरी लावली नाही किंवा कोठडीत त्याला भेटायलाही गेलेले नाहीत. त्यांच्याऐवजी, पूजा ददलानी या आर्यन आणि खान कुटुंबातील मध्यस्थ म्हणून काम करीत आहे. 8 ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामीन सुनावणीदरम्यान पूजा न्यायालयात हजर होती. कोर्टाने जामीन फेटाळला तेव्हा ती भावूकही झाली होती. आता अनेकांना प्रश्न पडला आहे की ती कोण आहे?

मन्नतचीही व्यवस्था पाहते पूजा

पूजा ददलानी ही 2012 पासून शाहरुखची मॅनेजर आहे. मुंबईतील शाहरुखच्या मन्नत निवासस्थानी आयोजित होणारे सण समारंभ, स्नेह मेळावे, पार्टी यांचे नियोजन सांभाळते. दिलीप कुमार यांचे निधन झाल्यानंतर सायरा बानो यांचे सांत्वन करण्यासाठी शाहरुख खान गेला होता तेव्हा पूजा त्याच्यासोबत होती. ती खान कुटुंबातील एक विश्वासू व्यक्ती आहे.

खान कुटुंबाची विश्वासू पूजा

पूजा शाहरुखचे ब्रँड एंडोर्समेंट, त्याची क्रिकेट टीम कोलकाता नाईट रायडर्स आणि व्यवसायाशी संबंधित इतर कामे हाताळते. मीडिया रिपोर्टनुसार, पूजाची संपत्ती सुमारे 6 दशलक्ष डॉलर्स (45 कोटी रुपये) आहे.

हेही वाचा - आर्यनसारख्या मुलांऐवजी खुनी, बलात्काऱ्यांना पकडण्यावर भर द्यावा - सोमी अली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.