ETV Bharat / sitara

"छोट्याशा प्रेम प्रकरणासाठी कधीपर्यंत रडणार?" : कंगनाचा हृतिकला सवाल - हृतिक कंगना प्रकरण

हृतिक रोशनने कंगना रणौत विरूध्द दाखल केलेली तक्रार आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आली आहे. यानंतर कंगना हृतिकवर पुन्हा भडकली असून "तू छोट्याशा प्रेम प्रकरणासाठी अजून कधीपर्यंत रडणार", असे हृतिकला उद्देशून लिहिले आहे.

Kangana asks Hrithik
कंगनाचा हृतिकला सवाल
author img

By

Published : Dec 15, 2020, 4:58 PM IST

मुंबई - अभिनेता हृतिक रोशनची एफआयआर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यानंतर कंगना रणौतने पुन्हा त्याच्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्याने परत एकचा विचित्र गोष्ट सुरू केल्याचे तिचे म्हणणे आहे.

दरम्याने गेल्या काही महिन्यापासून आजारी असलेले कंगनाचे आजोबा ब्रह्मचंद रणौत यांचे ९० व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचा शोक करणाऱ्या कंगनाने हृतिकवर जोरदार हल्ला चढविला असून त्याला बालिश ठरवण्याचा प्रयत्न केलाय.

Kangana asks Hrithik
कंगनाचा हृतिकला सवाल

ताज्या घडामोडीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना कंगनाने ट्विटरवर भाष्य केले आणि लिहिलं, "त्याची विचित्र कथा पुन्हा सुरू झाली आहे. आमचा ब्रेकअप झाल्यापासून आणि त्याच्या घटस्फोटाच्या कित्येक वर्षानंतर पण तो पुढे जाण्यास तयार नाही. मी माझ्या आयुष्यात थोडे धैर्य जमा करते तोच हा पुन्हा नाटक सुरू करतो.''

तिने पुढे हृतिकला त्यांच्या कथित संबंधांबद्दल त्रास देणे थांबवण्यास सांगितले आणि लिहिले, "हृतिक, तू छोट्याशा प्रेम प्रकरणासाठी अजून कधीपर्यंत रडणार?"

हृतिक रोशनने आपला ईमेल आयडी वापरुन कंगनाला काही इमेल केले होते असे कंगनाचे म्हणणे होते. याबद्दल तक्रार दाखल केल्याच्या चार वर्षांनंतर हे प्रकरण गुन्हेगारी बुद्धिमत्ता युनिटकडे (सीआययू) हस्तांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सोमवारी दिली.

हेही वाचा -दीपिका पदुकोण पुढल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर करणार धमाल, ५ चित्रपट होणार रिलीज

कंगना आणि हृतिक यांच्यात २०१६ मध्ये खूप वाद रंगला होता. तिने हृतिकला आपला एक्स म्हटल्यानंतर त्याने अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या. तर कंगनाने आपले प्रेम प्रकरण होते या मुद्द्यावर ठाम राहणे पसंत केले होते.

हेही वाचा -शाहिद कपूरने 'जर्सी'चे शूटिंग संपवले, कोरोना काळात मेहनत घेणाऱ्यांचे मानले आभार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.