ETV Bharat / sitara

जान्हवी कपूरने सांगितला मॅगझिन लोणावळा रोड ट्रीपचा किस्सा - जान्हवी कपूरने सांगितला मॅगझिन लोणावळा रोड ट्रीपचा किस्सा

जान्हवी कपूर अलिकडेच फोटोशूटसाठी लोणवळ्याला गेली होती. यावेळच्या मजा मस्तीचा किस्सा तिने सांगितला.

Janhavi Kapoor
जान्हवी कपूर
author img

By

Published : Feb 29, 2020, 5:19 PM IST

मुंबई - अभिनेत्री जान्हवी कपूर जेव्हा फोटोशूटसाठी लोणावळ्याला गेली होती तेव्हा या ट्रीपला तिने रोडट्रीपमध्ये परावर्तीत केले. दादाक स्टारने मार्च महिन्याच्या अंकासाठी महिलांची फॅशन आणि सेलेब्रिटी गॉसिप मॅगझिनसाठी कव्हर गर्लची निवड केली जाणार होती. याच्या शूटिंगसाठी जान्हवीला प्रवास करायचा होता. तिने आपल्या शाळेतील मित्राला येण्याची विनंती केली आणि तो तयार झाला.

जान्हवी कपूर

मॅगझिन कव्हरचे अनावरण २८ फेब्रुवारीला पार पडले. यावेळी फोटो शूटच्या वेळचा किस्सा जान्हवीने सांगितला. लोणावळ्याला जायला तिने शाळेतल्या मित्राला बोलावून घेतले. प्रवासात धमाल मस्ती करीत ते लोणावळ्याकडे जात होते. शूटिंगच्या कामाला नाही तर ट्रीपला जाण्याचा आनंद ते घेत होते. वाटेतल्या धाब्यावर त्यांनी चटपटीत खाण्यावर ताव मारला. हा प्रवास जास्तीत जास्त अनुभवायचा प्रयत्न त्यांनी केला.

कामाच्या पातळीवर जान्हवी कपूर सध्या खूप बिझी आहे. तीन चित्रपटांचे शूटिंग पूर्ण झाले असून रिलीजची प्रतीक्षा सुरू आहे. तिचा आगामी चित्रपट आहे 'गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल'. दुसऱ्या चित्रपटात ती कार्तिक आर्यन आणि राजकुमार रावसोबत 'रुही अफजा'मध्ये काम करीत आहे. त्याचबरोबर करण जोहरच्या आगामी 'तख्त'मध्येही ती दिसेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.