मुंबई - दिवंगत ऋषी कपूर आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांची कन्या रिद्धिमा कपूर सहनीने बॉलिवूडमधील कधीही न संपणाऱ्या नेपोटिझमच्या विषयावर भाष्य केले आहे. रिद्धिमा म्हणाली की कुणालाही कुटूंबाच्या पलीकडे जाऊन उद्योगात टिकून रहावे लागेल.
दिवंगत सुशांतसिंग राजपूत यांचे चाहते अजूनही सोशल मीडियावर बॉलिवूडमध्ये असलेल्या नातलगवाद आणि पक्षपातीपणाबद्दल ओरडत असतात. तर व्यवसायाने ज्वेलरी डिझाइनर असलेल्या रिद्धिमा म्हणाली की तिचा भाऊ रणबीर कपूर आणि चुलत बहिणी करिना आणि करिश्मा कपूर हे नेपोटिझममुळे इंडस्ट्रीत नाहीत. त्या आपल्या करियरमध्ये पात्र आहेत म्हणून त्या टिकून आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
"अॅडव्हान्टगेज क्या होता है. आम्ही नावाने मोठे झालो आहोत आणि त्याची सवय लावली आहे. जर एखाद्या अभिनेत्याच्या मुलाला हाच व्यवसाय करायचा असेल तर असे म्हटले जाईल की त्याला किंवा तिला कुटुंबामुळे चित्रपट मिळाले. पण तरीही रणबीर, करिश्मा, करिना त्यांच्या कामामुळे आणि कौशल्यामुळे यशस्वी ठरल्या आहेत,'' असं एका वेबसाईटशी बोलताना ती म्हणाली.
हेही वाचा - 'द फॅमिली मॅन' येणार ४ जूनला; बहुप्रतिक्षित नव्या सीजनच्या रोमांचक ट्रेलरचे अनावरण