ETV Bharat / sitara

वाजीद खान यांच्यावर व्हर्सोव्यातील दफनभूमीत पार पडले अत्यसंस्कार - संगीत दिग्दर्शक वाजीद खान

संगीत दिग्दर्शक वाजीद खान वयाच्या 42 व्या वर्षी निधन पावले. व्हर्सोव्याच्या दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. लॉकडाऊन असल्यामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थिती अंत्यविधी पार पडला. यावेळी त्यांचे भाऊ साजिद खान आणि अभिनेता आदित्य पंचोली उपस्थितीत होते.

Wajid Khan
वाजीद खान
author img

By

Published : Jun 1, 2020, 6:54 PM IST

मुंबई: प्रसिद्ध संगीतकार आणि गायक वाजिद यांच्या निधनाची बातमी सर्वांना चटका लावणारी ठरली. त्यांच्या अंत्यदर्शनाला त्याचा भाऊ साजिद खान उपस्थित होता.

शहरातील वर्सोवा भागात असलेल्या स्मशानभूमीत वाजीद खान यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले व दफन करण्यात आले. अभिनेता इरफानलाही या स्मशानभूमीत दफन करण्यात आले होते. साजिद व्यतिरिक्त अभिनेता आदित्य पंचोलीही अंत्यसंस्कारात सहभागी झाला. वाजीद खानच्या मृत्यूची बातमी संगीतकार सलीम मर्चंट यांनी सोशल मीडियावर शेअर केली.

त्यांनी ट्विट केले होते की, 'साजिद-वाजीदमधील माझा भाऊ वाजीदच्या मृत्यूच्या बातमीने मला उध्वस्त केले आहे. अल्लाह परिवारास धैर्य देईल. भाऊ @ wajidkhan7 आपला प्रवास सुरक्षित रहावा. तुम्ही लवकरच निघून गेलात. हे आपल्या संगीत परिवाराचे एक मोठे नुकसान आहे. मी तुटलो आहे. इन्ना लिलाही आणि इना इलाई राजेओन.'

प्रियंका चोपडा, अमिताभ बच्चन, परिणीती चोप्रा, अक्षय कुमार, सोनम कपूर, अर्जुन कपूर, नेहा धुपिया यांच्यासह जवळपास सर्व सेलेब्रिटींनी संगीत दिग्दर्शकाच्या निधनावर ट्विटवर शोक व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.