ETV Bharat / sitara

हे वर्ष लवकर संपावे, याची करिश्मा कपूरला प्रतीक्षा

सुरू असलेले वर्ष जगातील लाखो लोकांसाठी जीवघेणे ठरले आहे. यंदा आलेल्या कोरोना साथीच्या आजाराने संपूर्ण जग चिंताग्रस्त आहे. हे वर्ष लवकर संपावे यासाठी प्रतीक्षा करीत असल्याचे करिश्माने म्हटले आहे.

Karisma Kapoor
करिश्मा कपूर
author img

By

Published : Nov 28, 2020, 12:10 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने सध्या सुरू असलेले वर्ष सहन होत नसल्याचे म्हटले आहे. करिश्माने सोशल मीडियावर चाहत्यांसाठी आपली भावना शेअर केली आहे. तिने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती ब्लॅक टी-शर्ट, ब्लू फ्लेयर्ड जीन्स, चष्मा परिधान केलेली दिसत आहे.

शेअर केलेल्या फोटोला कॅप्शन देत तिने लिहिलंय, "यावर्षाचा निरोप घेण्याची प्रतीक्षा करू शकत नाही."

हेही वाचा -संजू सर पहिल्यापेक्षा जास्त देखणे दिसत आहेत - कंगना रणौत

सुरू असलेले वर्ष जगातील लाखो लोकांसाठी जीवघेणे ठरले आहे. यंदा आलेल्या कोरोना साथीच्या आजाराने संपूर्ण जग चिंताग्रस्त आहे. करिश्मानेही ही साथ संपावी यासाठी आपल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न केला होता. कोरोना विषाणूला लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केल्यानंतर बऱ्याच कलाकारांनी मदतीचा हात पुढे सरसावला आहे. यामध्ये अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, करीना कपूर, कंगना रणौत, शाहरुख खान यांच्याशिवाय इतर बऱ्याच कलाकारांनी शक्य होईल तेवढी मदत केली आहे. आता अभिनेत्री करिश्मा कपूर देखील मदतीसाठी पुढे सरसावली होती.

करिष्माने सोशल मीडयावरून पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली. आपल्या मुलांना सोबत घेऊन ही मदत करत असल्याचे तिने म्हटले होते. पीएम आणि सीएम रिलीफ फंडमध्ये तिने मदत केली असल्याचे सांगितले. तिने नेमकी किती मदत केली याबाबत उल्लेख केलेला नाही.

हेही वाचा -मी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काम केले - आयुष्यमान खुराणा

अलिकडेच करिश्माने फुटबॉल आयकॉन मॅराडोना यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.