मुंबई - मनोरंजनसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ यांची संस्था म्हणून सिंटा कार्यरत असते जी ही इंडस्ट्री सुरळीत चालावी यासाठी प्रयत्नशील असते. सिंटाचे अध्यक्ष विक्रम गोखले यांनी दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना आदरांजली वाहिली.
“आमचे लाडके दिलीप साब आता या जगात राहिले नाहीत ही अत्यंत दु:खदायक बातमी आपल्याला आज कळली आणि दुःखाचा डोंगर कोसळला. आम्हा सर्वांना वाटत होते की ते वयाची शंभरी पार करतील पण नियतीच्या डोक्यात वेगळेच काहीतरी होते. त्यांचे शरीर जरी जगातून नाहीसे झाले असले तरी त्यांनी केलेल्या कामामुळे ते अजरामर आहेत. ते अभिनयाची एक इन्स्टिट्यूशन होते आणि त्यांनी जगातील सर्वांचे मनोरंजन करून अनेक पिढ्यांना अभिनयाची गोडी लावत चित्रपटसृष्टीकडे आकर्षित केले.
ट्रॅजे़डी किंग
पडद्यावर दिलीप साब ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून प्रसिद्ध होते परंतु वास्तवात त्यांनी नेहमीच आनंद वाटला. त्यांना लोकांना हसवायला आवडत असे. तसेच त्यांचा परोपकारी स्वभाव सर्वांसाठी हवाहवासा वाटणारा होता. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीची क्षती झाली आहे जी भरून निघणे कठीण आहे. एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेला हा नट यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान खूप मोठे असून त्यांचे व्यावसायिक आणि वैयक्तिक परोपकारी योगदान कोणत्याही मोजमापच्या पलीकडे आहे. फिल्मफेयरचा पहिला उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळविणारा पहिला कलाकार म्हणजे दिलीप कुमार. तसेच त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. आम्हाला खात्री आहे की कुठल्याही अवॉर्डपेक्षा प्रेक्षकांचे प्रेम आणि आदर हा त्यांच्यासाठी कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठे होता. त्यांना अभिनय प्राणप्रिय होता.
सीएनटीएए आणि सीएडब्ल्यूटी (CINTAA & CAWT) मधील सर्वांना त्यांच्याबद्दल शब्दांद्वारे व्यक्त होणे देखील अदम्य आहे. आमच्या असोसिएशन आणि ट्रस्टमध्ये त्यांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय होते आणि त्यांचा सल्ला आणि मते आमच्यासाठी खरोखरच महत्त्वाचे आहेत. बंधुत्व म्हणजे काय हे त्यांनी आम्हाला शिकविले. ते आमचे खरे शिक्षक आणि गुरु होते. त्यांच्या आत्म्यास चिरंतन शांती लाभो अशी प्रार्थना करताना आम्ही त्यांचा परिवार, खासकरून सायराजीं, यांच्यासाठी संवेदना व्यक्त करतो. आम्ही निरोप घेतो असे म्हणणार नाही कारण दिलीप साब कायम आमच्या हृदयात राहणार आहेत .
हेही वाचा - ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांच्यावर शासकीय इतमामात दफनविधी