मुंबई - दाक्षिणात्य अभिनेता विजय लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'थलपथी ६४' असं त्याच्या आगामी सिनेमाचं शीर्षक असणार असून जेवियर ब्रीटो हे या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. तर लोकेश कनगराज यांचं दिग्दर्शन असणार आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. तर २०२० साली एप्रिल महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी अनिरुध्द म्यूझिक कंपोज करणार आहे.
-
IT'S OFFICIAL... #Thalapathy64 Vijay's new film to start in Oct 2019... Directed by Lokesh Kanagaraj... Produced by Xavier Britto... Anirudh will compose the music... Starts Oct 2019... April 2020 release. pic.twitter.com/SQwKijS489
— taran adarsh (@taran_adarsh) August 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">IT'S OFFICIAL... #Thalapathy64 Vijay's new film to start in Oct 2019... Directed by Lokesh Kanagaraj... Produced by Xavier Britto... Anirudh will compose the music... Starts Oct 2019... April 2020 release. pic.twitter.com/SQwKijS489
— taran adarsh (@taran_adarsh) August 24, 2019IT'S OFFICIAL... #Thalapathy64 Vijay's new film to start in Oct 2019... Directed by Lokesh Kanagaraj... Produced by Xavier Britto... Anirudh will compose the music... Starts Oct 2019... April 2020 release. pic.twitter.com/SQwKijS489
— taran adarsh (@taran_adarsh) August 24, 2019
चित्रपटाच्या इतर स्टारकास्टची घोषणा अद्याप झालेली नाही. यासोबतच सिनेमाबद्दलच्या इतर गोष्टीही अद्याप गुलदस्त्यातच आहेत. या सिनेमात अभिनेत्री कियारा अडवाणीची वर्णी लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली गेली नाही. चाहते विजयच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.