चित्रपटगृहे बंद असल्यामुळे अनेक निर्मात्यांनी पुन्हा ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर आपले चित्रपट प्रदर्शित करायला सुरुवात केली आहे. विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेला ‘शेरनी’ सुद्धा डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या आठवड्यातच चित्रपट निर्मात्यांनी या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले होते. जवळजवळ एक वर्षानंतर विद्या बालनला चित्रपटात पाहण्यासाठी चाहते उत्सुक असताना निर्मात्यांनी टिजर रिलीज केला असून २ जूनला ट्रेलर रिलीज होणार असल्याची घोषणा केली आहे.
अनेक वर्षे एकत्रितपणे काम केल्यानंतर टी-सीरिज आणि ॲबंशिया एंटरटेनमेंट हे ‘शेरनी’साठी पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. ‘शेरनी’ ही एक अपारंपरिक कथा असून यात विद्या बालन प्रथमच एका वन अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून यात मानव-पशु संघर्ष अनुभवायला मिळेल.
हेही वाचा - HBD आर माधवन : ''माझ्या एकतर्फी दुश्मनाला हॅप्पी बड्डे आणि लै लै लव''