मुंबई - बहुचर्चित 'शिकारा' या चित्रपटाचा दुसरा ट्रेलरप्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या ट्रेलरने चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे. दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचा बऱ्याच दिवसानंतर 'शिकारा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
नुकताच या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'शिकारा-अ लव्ह लेटर फ्रॉम काश्मीर', ही कथा काश्मीरच्या १९९० साली घडलेल्या घटनेवर आधारित आहे. काश्मीरच्या एका समुदायाला बेघर करण्यात आले होते. ३० वर्षानंतरही ते आपल्या घरी परतू शकले नाही. या चित्रपटातून नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सादिया आणि आदिल खान हे दोघेही या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करत आहेत. सादिया शांतीची भूमिका साकारत आहे तर आदिल शीवच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं पार्श्वसंगीत ए. आर. रेहमान यांनी केलं असून सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची निर्मिती फॉक्स स्टार स्टूडिओज अंतर्गत करण्यात आली आहे.