मुंबई - बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जाणारा विकी कौशल लवकरच आगामी 'भूत' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आत्तापर्यंत या ट्रेलरवर २४ मिलियनपेक्षा अधिक व्हिव्ज मिळाले आहेत. या चित्रपटात हॉरर असलेल्या सेटवर काम करण्याचा अनुभव कसा होता, हे सांगण्यासाठी विकीने या चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने खऱ्या आयुष्यात त्याला कोणत्या गोष्टींची भीती वाटते, हेदेखील सांगितले आहे.
'भूत' चित्रपटाच्या ट्रेलरनंतर चाहत्यांना या चित्रपटाची बरीच उत्सुकता आहे. मात्र, या चित्रपटात भूमिका साकारणं म्हणजे विकीसमोर एक आव्हान होतं. विकीला खऱ्या आयुष्यातही भूताची भीती वाटते. तसेच, खोल पाण्याचीही त्याला भीती वाटते. जेव्हा शूटिंगदरम्यान त्याला पाण्यात चित्रीकरण करायचे होते, तेव्हा त्याला प्रचंड तणाव आला होता. मात्र, चित्रपटाच्या टीमने त्याच्याकडून सराव करुन घेतल्यानंतर त्याने शूटिंग पूर्ण केले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा-'लेडी सिंघम': महिला पोलीस उपनिरीक्षक बनली 'हिरोईन'
'भूत' चित्रपटात काही थरारक सीन देखील पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी देखील विकीने खास मेहनत घेतली होती. जहाजावर घडत असलेल्या विचित्र घटनेमागे कोणते रहस्य दडले आहे, याचा शोध घेताना विकी कौशल या चित्रपटात दिसणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
भानू प्रताप सिंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, धर्मा प्रो़डक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. २१ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - रोहित शेट्टी बनवणार 'चेन्नई एक्सप्रेस २', 'ही' जोडी साकारणार भूमिका?