मुंबई - 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटातून प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता विकी कौशल सध्या भारतीय सैन्यासोबत काही आनंदाचे क्षण घालवत आहे. विकीनं सैन्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. अरुणाचल प्रदेशातील १४ हजार फूट उंचावरील भारत-चीन सीमेवरील तवांग येथील सैनिकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाल्यानं खूप आनंदी असल्याचं त्यानं म्हटलं होतं. अशात आता त्याचा आणखी एक फोटो समोर आला आहे.
या फोटोत विकी चपाती बनवताना दिसत आहे. फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने म्हटलं आहे, की आयुष्यातील पहिली चपाती बनवत आहे. या गोष्टीचा आनंद आहे, की ती सैनिकांसाठी आहे. या फोटोत विकी सैन्याच्या वेशभूषेत दिसत आहे. आर्मी शेफ यांच्याकडून तो चपाती बनवण्याचे धडे घेत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, विकी कौशलकडे करण जोहरचा मल्टीस्टारर चित्रपट 'तख्त', 'भूत पार्ट वन- द हॉन्टेड शिप' आणि फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा बायोपिक आहे. हा बायोपिक मेघना गुलजार दिग्दर्शित करणार आहे. भारत पाक यांच्यात १९७१ मध्ये झालेल्या युध्दाच्यावेळी सॅम मानेकशॉ भारतीय सैन्य प्रमुख होते.
.