ETV Bharat / sitara

'चुपके चुपके'च्या रिमेकमध्ये अमिताभची भूमिका साकारणार विकी कौशल? - दिग्दर्शक लव्ह रंजन करणार

'चुपके चुपके' चित्रपटाचा रिमेक दिग्दर्शक लव्ह रंजन करणार आहेत. या चित्रपटात राजकुमार राव धर्मेंद्रच्या भूमिकेत दिसणार आहे. यात अमिताभ यांनी साकारलेली भूमिका विकी कौशल करणार असल्याची चर्चा आहे. मात्र याला अद्यापही विकीने दुजोरा दिलेला नाही. किंवा निर्मात्यानेही याचे सूतोवाच केलेले नाही.

Chupke Chupke remake
'चुपके चुपके
author img

By

Published : Dec 15, 2020, 3:50 PM IST

हैदराबाद - १९७५ मध्ये रिलीज झालेल्या 'चुपके चुपके' चित्रपटाचा रिमेक दिग्दर्शक लव्ह रंजन करणार आहेत. या चित्रपटात राजकुमार राव धर्मेंद्रच्या भूमिकेत दिसणार आहे, तर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित अभिनेता विक्की कौशल या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांनी साकारलेली भूमिका वठवणार असल्याची चर्चा आहे.

Chupke Chupke remake
१९७५ मध्ये रिलीज झालेल्या 'चुपके चुपके' चित्रपटाचा रिमेक

राजकुमार राव आणि विकी कौशल यांनी चुपके चुपके चित्रपटामध्ये स्क्रिन स्पेस शेअर केल्यास या रिमेकची उंची वाढू शकते. त्यामुळे निर्माता हा विचार करू शकतात. मात्र अद्यापही या बातमीला विकी कौशलकडून दुजोरा मिळालेला नाही.

दरम्यान, त्यानंतर विक्की कौशल शूजित सरकार यांच्या आगामी सरदार उधम सिंगमध्ये दिसणार आहे. शिवाय एका चित्रपटात तो माजी ब्युटी क्वीन मानुषी छिल्लरबरोबर स्क्रीन स्पेस शेअर करतानाही दिसणार आहे.

हेही वाचा -दीपिका पदुकोण पुढल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर करणार धमाल, ५ चित्रपट होणार रिलीज

भूषण कुमार यांच्यासमवेत चुपके चुपके रिमेकची निर्मिती लव्ह रंजन करणार आहेत. या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका कोण करणार हे निश्चित झाले असून मूळ चित्रपटात शर्मिला टागोर आणि अमिताभ बच्चन यांनी साकारलेली भूमिका कोण करणार हे ठरणे अद्याप बाकी आहे.

हेही वाचा -पंकज त्रिपाठी आणि अक्षय कुमार 'बच्चन पांडे'मध्ये येणार पहिल्यांदाच एकत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.