मुंबई (महाराष्ट्र) - विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या लग्नाची (Vicky-Katrina wedding) जोरदार चर्चा सुरु असल्याने मुंबई आणि जयपूर विमानतळावर मोठी गर्दी झाली आहे. सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथील शाही लग्नाला उपस्थित राहणार असलेल्या सेलिब्रिटींची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केल्याचे दृष्य पाहायला मिळाले.
मंगळवारी सकाळी, कॅटरिनाचा जवळचा मित्र आणि चित्रपट निर्माता कबीर खान लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जयपूरला रवाना झाला. त्याची पत्नी मिनी माथूर आणि मुलगी सायरासोबत मुंबई विमानतळावर पोहोचतानाचे त्याचे अनेक फोटो इंटरनेटवर झळकले आहेत.
कॅटरिनाने कबीरसोबत न्यूयॉर्क, एक था टायगर आणि फँटम सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
विशेष म्हणजे आज नेहा धुपिया आणि अंगद बेदी (Neha Dhupia and her husband Angad Bedi) देखील मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. नेहा आणि अंगद निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये विमानतळावर पोहोचले. कॅटरिना आणि विकीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी जयपूरला जाणार्या ए-लिस्टर्समध्ये हे जोडपे देखील आहे.
सोमवारी रात्री विकी आणि कॅटरिना कुटुंबीय आणि मित्रांसह लग्नाच्या ठिकाणी पोहोचले. हे जोडपे ९ डिसेंबरला लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. विकी आणि कॅटरिना १२ डिसेंबरपर्यंत बरवारा किल्ल्यावर राहणार आहेत.
हेही वाचा - Vicky Katrina Wedding: विकी कॅटरिनाचे जल्लोषात स्वागत, संगीत सोहळ्याने होणार 'विकॅट' विवाहाची सुरुवात