ETV Bharat / sitara

Vicky-Katrina wedding: विकी-कॅटरिनाचे जल्लोषात स्वागत, संगीत सोहळ्याने होणार 'विकॅट' विवाहाची सुरुवात - कॅटरिना विकीचे लग्नविधी

विकी कौशल आणि कॅटरिना कैफ 6 डिसेंबर रोजी सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्टवर पोहोचले. कुटुंबासह त्यांच्या लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्यावर बरवारा किल्ल्यावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. विकी-कॅटरिनाच्या लग्नसोहळ्याला आजपासून संगीत सोहळ्याने सुरुवात होणार आहे.

विकॅट' विवाहाची सुरुवात
विकॅट' विवाहाची सुरुवात
author img

By

Published : Dec 7, 2021, 3:43 PM IST

जयपूर (राजस्थान) - 9 डिसेंबर रोजी सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेस किल्ल्यावर थाटामाटात विवाह करण्यासाठी बॉलीवूड स्टार विकी कौशल आणि कॅटरिना कैफ दाखल झाले आहेत. यांच्या लग्नाचे विधी आज (मंगळवार) पासून सुरू होणार आहेत.

विकी कौशल आणि कॅटरिना कैफ हे जोडपे कुटुंबीय आणि मित्रांसह सोमवारी रात्री लग्नाच्या ठिकाणी पोहोचले. येथे त्यांचे भव्य फटाक्यांसह स्वागत करण्यात आले. त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि त्यांच्या कपाळाला टिळक लावण्यात आला.

मंगळवारी रात्री होणाऱ्या संगीत सोहळ्याने विकॅट विवाह सोहळ्याची सुरुवात होईल.

तत्पूर्वी, सोमवारी दुपारपासून जयपूर विमानतळ गजबजला होता, कारण कॅटरिनाची भावंडे आणि मित्र एकामागून एक येत होते. सोमवारी रात्री, कॅटरिना आणि विकी कौशल यांच्यासह डझनभर पाहुणे विवाहस्थळी दाखल झाले. त्यांचे बरवारा किल्ल्यावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या कुटुंबाला बरवारा किल्ल्यावर नेण्यासाठी तीन आलिशान वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.

विकी आणिकॅटरिना १२ डिसेंबरपर्यंत बरवारा किल्ल्यावर राहणार आहेत. लग्नानंतर दोघेही चौथ मातेच्या मंदिरात जाण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री या जोडप्याचा संगीत सोहळा होणार असून त्यानंतर बुधवारी सकाळी 11 वाजता हळदी समारंभ होईल. त्यानंतर 9 डिसेंबरला विवाहाचा दिवस असेल. तेव्हा सेहराबंदीसारख्या कार्यक्रमांचे नियोजन केले जाईल. दुपारी ३ वाजता हे जोडपे फेरे घेतील. गुरुवारी दुपारी आणि नंतर रात्री डिनर आणि पूलसाइड पार्टी होईल. शाही थाटबाटात हे जोडपे विवाहबंधनात अडकणार आहे.

हा विवाह सोहळा पूर्णपणे खाजगी ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा - Complaint Filed Against Vicky Katrina : विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांच्या विरोधात राजस्थानमध्ये तक्रार दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.