ETV Bharat / sitara

Complaint filed against Vicky-Katrina : विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांच्या विरोधात राजस्थानमध्ये तक्रार दाखल - विकी कौशल आणि कॅटरिना कैफ विवाह अपडेट

राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे 9 डिसेंबर रोजी अभिनेता विकी कौशल आणि कॅटरिना कैफ (Vicky Kaushal and Katrina Kaif wedding ) यांचा विवाह पार पडणार आहे. या विवाहादरम्यान, चौथ माता मंदिराकडे (Chauth Mata temple) जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. याच्या विरोधात राजस्थानस्थित वकील नैत्राबिंद सिंग जदौन यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली आहे.

विकी कौशल आणि कॅटरिना कैफ
विकी कौशल आणि कॅटरिना कैफ
author img

By

Published : Dec 7, 2021, 3:25 PM IST

जयपूर (राजस्थान) - बॉलीवूड स्टार विकी कौशल आणि कॅटरिना कैफ (Vicky Kaushal and Katrina Kaif wedding ) यांच्या नियोजित लग्नामुळे 6 ते 12 डिसेंबर दरम्यान चौथ माता मंदिराकडे (Chauth Mata temple) जाणारा रस्ता बंद ठेवल्याच्या विरोधात राजस्थानस्थित एका वकिलाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली आहे. सवाई माधोपूर जिल्ह्यात, बरवारा येथे चौथ मातेचे प्राचिन मंदिर आहे. विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या विवाहामुळे भाविकांना दर्शन गेण्यात अडथळे निर्माण झाले आहेत.

वकील नैत्राबिंद सिंग जदौन यांनी सिक्स सेन्स फोर्ट बरवाराचे व्यवस्थापक, सेलिब्रिटींच्या लग्नाचे ठिकाण, कॅटरिना कैफ, विकी कौशल आणि जिल्हाधिकारी यांच्या विरोधात मंदिराकडे जाणारा रस्ता बंद केल्यामुळे तक्रार दाखल केली. या तक्रारीसोबतच भाविकांना होणारा त्रास पाहता मंदिराकडे जाण्याचा मार्ग खुला करण्याची विनंती करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला आपला कोणताही आक्षेप नसल्याचे जदौन यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

"चौथ का बरवारा येथे 570 वर्ष जुने चौथ मातेचे ऐतिहासिक मंदिर आहे. दररोज शेकडो भाविक मंदिरात जाऊन प्रार्थना करतात. मंदिराच्या मार्गावर हॉटेल सिक्स सेन्स आहे. हॉटेल व्यवस्थापकाने रस्ता बंद केला आहे. 6 ते 12 डिसेंबर या कालावधीत जिल्हाधिकार्‍यांच्या देखरेखीखाली मंदिराकडे मार्गस्थ होणार आहे.त्यामुळे भाविकांना मंदिरात जाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पुढील सहा दिवस हॉटेल सिक्स सेन्स ते मंदिराकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद केला जाईल. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांच्या आणि भाविकांच्या भावना लक्षात घेऊन चौथ माता मंदिराकडे जाण्याचा मार्ग हॉटेल सिक्स सेन्सच्या समोरील बाजूने खुला करण्यात यावा," असे जदौन यांनी तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा - Katrina Vicky Reaches Sawai Madhopur : वधू वराचे लग्नस्थळी आगमन, आजपासून होणार विधींना सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.