ETV Bharat / sitara

Ankita Lokande Wedding Gift : अभिनेत्री अंकिता लोखंडेला विकीने दिली कोट्यवधीची भेट - अंकिता लोखंडेला फार्म हाऊस भेट

विकी जैनने अंकिता लोखंडेला या राजेशाही लग्नात कोट्यवधींची भेट ( Ankita Lokande Wedding Gift ) दिली आहे. या रिपोर्टनुसार, विकीने अंकिताला एक खाजगी व्हिला (फार्म हाऊस) भेट म्हणून दिला आहे. मात्र याची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसू शकतो. या व्हीलची किंमत तब्बल ५० कोटी असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच विकीने एक खाजगी बोटसुद्धा खरेदी केली आहे. आणि त्याची किंमत ८ कोटी असल्याचं म्हटलं जात आहे.

Ankita Lokande Wedding Gift
अंकिता लोखंडे विकी जैन
author img

By

Published : Dec 16, 2021, 2:21 PM IST

मुंबई - प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे ( Actress Ankita Lokhande ) आणि विकी जैन ( Vicky Jain ) यांचा 14 डिसेंबर रोजी शाही लग्न सोहळा ( Ankita Lokhande Vicky wedding ) पार पडला. अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी आपल्या लग्नांतील काही खास फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. लग्नानंतर विकी जैन याने अंकिता दिलेल्या गिफ्टची सर्वत्र चर्चा होत आहे. विकीने अंकिताला कोट्यावधी रुपयांचे फॉर्म हाऊस गिफ्ट केले आहे.

कोट्यवधीचा व्हिला भेट -

विकी जैनने अंकिता लोखंडेला या राजेशाही लग्नात कोट्यवधींची भेट ( Ankita Lokande Wedding Gift ) दिली आहे. या रिपोर्टनुसार, विकीने अंकिताला एक खाजगी व्हिला (फार्म हाऊस)भेट म्हणून दिला आहे. मात्र याची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसू शकतो. या व्हीलची किंमत तब्बल ५० कोटी असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच विकीने एक खाजगी बोटसुद्धा खरेदी केली आहे. आणि त्याची किंमत ८ कोटी असल्याचं म्हटलं जात आहे.

शुभेच्छांचा वर्षाव -

गेल्या अनेक दिवसांपासून ज्या लग्नसोहळ्याची चर्चा रंगली होती, तो विवाहसोहळा नुकताच पार पडला. अभिनेत्री अंकिता लोखंडे बॉयफ्रेंड विकी जैनसोबत विवाहबंधनात अडकली आहे. अंकिता आणि विकीच्या लग्नाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होती. अंकिताचे चाहते या दिवसाची वाट पाहात होते. ते दोघे ही विवाहबधंनात अडकले असून अंकिता आणि विकी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता.

विक्की जैनने असे केले होते अंकिताला प्रपोज -

अंकिता लोखंडेने काही दिवसांपूर्वी तिची बॅचलर पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये रश्मी देसाई व्यतिरिक्त तिच्या अनेक मैत्रिणींनी हजेरी लावली होती. अभिनेत्रीने विकीला तिच्या 34 व्या वाढदिवसाच्या पार्टीला आमंत्रित केले होते तेव्हा अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली होती. यानंतर अंकिताने मौन बाळगले असले तरी 2019 मध्ये विक्की जैनने अंकिता लोखंडेला प्रपोज केले होते.

हेही वाचा - Ankita Lokhande Vicky Jain Marriage : अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन अडकले लग्नबंधनात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.