ETV Bharat / sitara

वरुण धवनची बॉलिवूडमध्ये ८ वर्षे, चाहत्यांचे मानले आभार - Son of David Dhawan

अभिनेता वरुण धवनने करण जोहरच्या स्टुडन्ट ऑफ द इयर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता त्याला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. याबद्दल आपल्या चाहत्यांचे त्याने आभार व्यक्त केले आहेत.

Varun Dhawan
वरुण धवन
author img

By

Published : Oct 20, 2020, 3:01 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या बॉलिवूडमधील पदार्पणाला 8 वर्षे झाली आहेत. याबद्दल त्याने सर्व चाहत्यांचे सोशल मीडियावरुन आभार व्यक्त केले आहेत. त्याने लिहिलंय, "तुमच्या आणि माझ्या दरम्यान हा प्रवास सुरू होऊन ८ वर्षे झाली आहेत. कोणीही विश्वास ठेवला नसताना तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल सर्वांचे आभार. मला आठवते, मी प्रत्येक शहराचा दौरा केलाय. तिथे लोकांनी पत्र, भेटवस्तु, टॅटू आणि भरपूर प्रेम दिले आहे.

  • It’s been 8 years since this journey began between me and u. Thank u for believing in me when no one did. I remember every city I toured. The signs, letters, gifts, tattoos and most Importantly the love. pic.twitter.com/RCHfnFdGzX

    — VarunDhawan (@Varun_dvn) October 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

वरुणने लिहिलंय, "जेव्हा मी हसलो तेव्हा तुम्हीही हसला, जेव्हा मी रडलो, तेव्हा तुम्हीसुद्धा रडला. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला माहित आहे की मी केलेल्या प्रत्येक गोष्टीचे तुम्ही कौतुक केले. सुरक्षित रहा, सर्वांना प्रेम. तुमचा वरुण. "

वरुण धवन हा बॉलिवुड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा आहे. वरुणने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या स्टुडन्ट ऑफ द इयर या चित्रपटामध्ये सह-नायकाची भूमिका करून बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.