मुंबई - अभिनेता सलमान खान आणि वरुण धवन यांनी ऑनस्क्रिन धमाल केली होती. आता ते दोघे पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. सलमानच्या आगामी 'अंतिम : द फायनल ट्रूथ' या चित्रपटातील एका गाण्यात वरुण धलन झळकणार आहे.
एका वेबलॉईड रिपोर्टनुसार वरुण धवनने सलमानच्या 'अंतिम : द फायनल ट्रूथ' या चित्रपटात एका गाण्याचे शूट करण्यास संमती दिल्याचे समजते. सध्या लोकप्रिय असलेला आणि उत्तम डान्सर असलेला वरुण धवन सलमानच्या चित्रपटातील एक गाण्यात असावा हे टीमने ठरवले होते. याबाबत सलमानने भेट घेऊन वरुणला विचारले असता त्याने आनंदाने ही ऑफर मान्य केल्याचे समजते.
या गाण्यामध्ये सलमान आणि वरुण धवन एकत्र डान्स करताना दिसणार आहेत. या गाण्याची रिहर्सही सुरू झाल्याचे समजते.
हेही वाचा -शिर्डीत आलेल्या सोनू सूदने मुंबईतील बेकायदेशीर बांधकामाबद्दल धरले मौन
सलमानने अंतिम सिनेमाचे शूटिंग डिसेंबर २०२० मध्ये सुरू केले आहे. यात सलमान खान शीख पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. यात त्याचा मेव्हणा आयुष शर्मा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. २०१८ मध्ये मराठीत गाजलेल्या 'मुळशी पॅटर्न' सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे. महेश मांजरेकर याचे दिग्दर्शन करीत आहेत.
हेही वाचा -केजीएफ स्टार यशने कोरोनामुळे रद्द केले बर्थ डे सेलेब्रिशन