मुंबई - सध्या अरुणाचल प्रदेशमध्ये आपल्या आगामी ‘भेडिया’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी येत असलेल्या बॉलिवूड स्टार वरुण धवनने एका लहान मुलाचा मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहते पसंती दर्शवत आहेत.
वरुण धवनने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. यात एका मुलाचा वाढदिवस साजरा होताना आपल्याला दिसतो. त्या मुलाला केक भरवण्यासाठी वरुण हात उचलतो पण त्याच्या तोंडाशी नेताना तो त्याच्या पालकाला देतो. यावेळी तो छोटा मुलगा केक मिळणार या उत्साहाने तोंड उघडतो पण त्याच्या पदरी निराशा येते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या व्हिडिओला वरुण धवनने अजून मजेदार बनवण्यासाठी देव आनंदची भूमिका असलेल्या १९६५ च्या रोमँटिक गाइड या चित्रपटामधील 'क्या से क्या हो गया बेवफा तेरे प्यार में' या गाण्याचा वापर केला आहे.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये वरुणने "बेटी का बडे बनाया बाप ने. मला माफ करा" असे लिहिले आहे.
वाणी कपूर, फरहान अख्तर, अनुष्का शर्मा यासारख्या सेलेब्रिटींनी व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा - ईटीव्ही विशेष - सिंधुदुर्गातील दशावतार कलाकारांची लॉकडाउनमुळे स्वतःच्या पोटाशीच लढाई