ETV Bharat / sitara

वरुण धवनने आईसाठी लिहिली कविता, शेअर केला बालपणीचा फोटो - VARUN-DHAWAN news

वरुण धवनने आपल्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. यात तो आईसोबत दिसत आहे. वरुणने आपल्या आईची आठवण काढताना तिच्यासाठी एक ह्रदयस्पर्शी कविता लिहिली आहे.

VARUN-DHAWAN
वरुण धवन
author img

By

Published : Mar 30, 2020, 2:02 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने आपला लहानपणीचा आईसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्याने काळजाला भिडणारी एक कविताही लिहिली आहे. ती कविता इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, मी आणि कशा प्रकारे एकत्र होतो, याबाबतची माहिती दिली आहे.

या फोटोला अनेकांनी कॉमेंट दिल्या आहेत. यात आदिती राव हैदरी, दिया मिर्झा आणि मनीष मल्होत्रा यांचा समावेश आहे.

दिया हिने लिहिलंय, लाली आंटी तर प्रेम आहेत. तर मनीष आणि आदिती राव हैदरी यांनी स्माईल करणारी इमोजी पोस्ट केली आहे.

अलिकडेच वरुण धवनने एक रॅप साँग इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. लॉकडाऊनच्या काळात बाहेर पडू नका हा संदेश त्याने यातून दिला होता.

संपूर्ण बॉलिवूड परिवाराने त्याच्या या रॅपचे कौतुक केले होते. रॅपर बादशाह, सिद्धांत चतुर्वेदी, अर्जुन कपूर, कैटरीना कैफ, अमाल मलिक यांनी कॉमेंट करीत त्याला प्रोत्साहन दिले होते.

वरुण धवन लवकरच आगामी 'कुली नंबर 1' या चित्रपटात सारा अली खानसोबत झळकणार आहे. हा त्याच्या वडिलांनी बनवलेल्या १९९५ च्या हिट चित्रपटाचा रिमेक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.