ETV Bharat / sitara

दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा शूटिंग सुरू होणार असल्याचे अभिनेत्री वाणी कपूर उत्साही - Akshay Kumar latest news

दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा काम सुरू केल्याने आनंद झाला असल्याचे अभिनेत्री वाणी कपूरने म्हटले आहे. तिचा आगामी चित्रपट बेल बॉटम असून यात ती अक्षय कुमारसोबत भूमिका साकारत आहे. याचे शूटिंग स्कॉटलंडमध्ये पार पडणार आहे.

Vaani Kapoor
वाणी कपूर
author img

By

Published : Jul 15, 2020, 4:06 PM IST

मुंबई - वाणी कपूरने तिच्या आगामी ‘बेल बॉटम’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा काम सुरू केल्याने तिला आनंद झाला असल्याचे अभिनेत्रीने सांगितले. "मी, प्रामाणिकपणे सांगते, की दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा काम सुरू झाल्याने खूप आनंदी आहे. नक्कीच, अतिरिक्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि सर्व प्रतिबंधात्मक उपाय लक्षात ठेवणे आवश्यक आहे. परंतु नवीन प्रवास करण्यासाठी उत्साही वाटते!" असे वाणी म्हणाली.

चित्रपटाचे मुख्य कलाकार अक्षय कुमार आणि निर्मात्यांनी चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते स्कॉटलंडमध्ये चित्रित केले जाईल. खिलाडी स्टारबरोबर पहिल्यांदा काम करताना वाणी म्हणाली: "ठीक आहे, ही माझ्यासाठी एक उत्तम संधी आहे! मला अक्षय सरांचा खूप आदर आहे. मी खूप उत्साही आहे आणि मी खरोखर अनुभवाची वाट पाहत आहे." अभिनेता अक्षय कुमार पहिल्यांदा स्कॉटलंडमध्ये शूटिंग करणार आहे. शूटच्या ठिकाणाची माहिती न देता वाणीने सांगितले, की कोरोनाची साथ असतानाही तिच्या आठवणी बनवणार आहे.

हेही वाचा - अक्षय कुमारच्या 'बेल बॉटम'च्या शूटिंगला होणार सुरूवात, लंडनमध्ये होणार शूटिंग

खऱ्या घटनांपासून प्रेरित होऊन ऐंशीच्या दशकाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट तयार करण्यात आला असून भारतातील एका विसरलेल्या नायकाची कथा सांगण्यात आली. रणजित एम. तिवारी दिग्दर्शित बेल बॉटम या वर्षाच्या शेवटी फ्लोअरवर जाणार आहेत. या चित्रपटाची कथा असीम अरोरा आणि परवीज शेख यांनी लिहिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.