मुंबई - अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या चित्रपटापासून काहीशी दूर आहे. परंतु तिची स्टाईल आणि फॅशन सेन्समुळे ती नेहमी चर्चेत असते. अलिकडेच तिचा एक फोटो व्हायरल झालाय. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यासोबतचा हा फोटो आहे. यात तिने विराटला मिठी मारली आहे. या फोटोवर कॉमेंट्सचा पाऊस पडत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
विराट कोहली आणि उर्वशी रौतेला यांचा हा व्हायरल फोटो मात्र पूर्ण खरा नाही. यातील विराटला तिने मिठी मारल्याचे दिसत असले तरी तो विराटचा पुतळा आहे. हा पुतळा अक्षरशः हुबेहुब दिसत असल्यामुळे अनेकांचा गोंधळ होणे स्वाभाविक आहे. उर्वशीने फोटो पोस्ट केल्यानंतर तब्बल १० लाख लोखांनी याला लाईक केले आहे.
विराट आणि उर्वशीच्या या फोटोवर भरपूर कॉमेंट्स आल्या आहेत. एक फॅनने लिहिलंय, "विराटचा घटस्फोट करायचा आहे का ?', तर दुसऱ्या कॉमेंटमध्ये लिहिलंय, अनुष्काला तुझा पत्ता हवाय."
उर्वशी रौतेला बॉलिवूडची अभिनेत्री असून ती एक उत्तम मॉडेल समजली जाते. सनी देओलच्या 'सिंह साब द ग्रेट' चित्रपटातून ब़लिवूडमध्ये पदर्पण केले होते. त्यानंतर तिने 'सनम रे', 'ग्रेट ग्रँड मस्ती' और 'हेट स्टोरी 4' या चित्रपटातून भूमिका केल्या आहेत.ती उत्तम नृत्यांगणाही आहे. अलिकडेच तिने 'अर्बन फिटेस्ट वुमन ऑफ द ईयर' हा किताब मिळवला आहे.