ETV Bharat / sitara

''दत्तू, तू किधर चला गया था...'', अनुपम खेर गहिवरले - अनुमप खेर यांनी घेतली दत्तूची भेट

अनुपम खेर यांचा सहाय्यक दत्तू सावंत त्यांना सहा महिन्यानंतर भेटला. गेली ३६ वर्षे खेर यांच्यासेबत निरंतर असणारा हा दत्तू पुन्हा भेटल्याचा एक व्हिडीओ खेर यांनी शेअर केला आहे.

Anupam Kher
अनुपम खेर
author img

By

Published : Sep 7, 2020, 12:29 PM IST

मुंबई - लॉकडाऊननंतर अनेकांना दूर राहणे भाग होते. अनुपम खेर यांच्या सहाय्यक दत्तू हा गेले सहा महिने त्यांच्यापासून लांब गेला होता. सहा तासही लांब न राहणारा दत्तू सहा महिन्यांनंतर अनुपम यांना भेटला त्याचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे.

''दत्तू तू किधर चला गया था'', असे म्हणताना अनुपम खेर गहिवरल्याचे दिसत आहे. दत्तूच्या भेटीचा आनंद खेर यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. दत्तून तिरंगा मास्क परिधान केला असून अनुपम त्याची आस्थेने विचारपूस करताना दिसतात.

दत्तूच्या कुटुंबीयांचीही विचारपूस करताना अनुपम व्हिडीओमध्ये दिसतात. खूप दिवसांनंतर परिस्थिती सामान्य होत चालली आहे. कोरोनाचा कहर संपलेला नसला तरी, आयुष्य पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हेच या व्हिडीओत दिसून येते.

"जवळजवळ ६ महिन्यांनंतर मी माझ्या सहाय्यक दत्तूला भेटलो, कारण आम्ही एकत्र न्यूयॉर्कहून परत आलो आहोत. त्याला पाहून मला आश्चर्य वाटले. गेल्या ३६ वर्षांपासून तो माझ्याबरोबर काम करत आहे. तो माझ्या कुटुंबाचा एक भाग आहे. त्याच्यासारख्या माणसांचे आयुष्य खूप सुंदर आहे. "जय हो! #दत्तासावंत #फिशरी # बिर्याणी # प्रेम # बाँडिंग # निष्ठा # सहकार्य," असं त्यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.