मुंबई - संजय दत्तची मुलगी त्रिशाला हिच्या बॉयफ्रेंडचे अकाली निधन झाले आहे. २ जुलैला त्याने शेवटचा श्वास घेतला असून याबद्दलचे दुःख व्यक्त करत त्रिशालाने एक पोस्ट शेअर केली आहे. या भावनिक पोस्टवरून दोघांमध्ये असलेलं घट्ट नातं दिसून येत आहे.
माझं हृदय तुटलं आहे. माझ्यावर प्रेम करण्यासाठी, नेहमी माझ्यासोबत उभा राहण्यासाठी आणि माझी काळजी घेण्यासाठी आभारी आहे. आयुष्यात कधीही मिळाला नसेल एवढा आनंद तू मला दिला. तुला भेटून मी या जगातील सर्वात भाग्यवान मुलगी झाले. तू कायम माझ्यात जिवंत राहशील. मी तुझ्यावर प्रेम करते आणि तुला खूप मिस करेल, जोपर्यंत आपण पुन्हा भेटत नाही. नेहमी तुझीच...बेला मिया, असे त्रिशालाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
त्रिशाचा बॉयफ्रेंड हा इटालियन होता. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समजू शकले नाही. त्रिशाला ही संजयची पहिली पत्नी ऋचा शर्माची मुलगी आहे. ती सध्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये आपलं नशीब आजमावत आहे.