ETV Bharat / sitara

अंगावर शहारे आणणारा 'दुर्गामती'चा ट्रेलर रिलीज - Bhumi Pednekar latest news

दुर्गामती या थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. भूमी पेडणेकरची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट ११ डिसेंबर रोजी प्राईम व्हिडिओवर प्रसारित होईल.

Trailer release of 'Durgamati'
'दुर्गामती'चा ट्रेलर रिलीज
author img

By

Published : Nov 25, 2020, 5:38 PM IST

मुंबई - अंगावर भीतीचे रोमांच उभे करणाऱ्या दुर्गामती चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. भूमी पेडणेकरची वेगळी भूमिका यात पाहायला मिळणार आहे. भागमती या तेलुगु चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असून याचे दिग्दर्शनही भागमतीचा दिग्दर्शक अशोक यांनी केले आहे.

हेही वाचा - भूमी पेडणेकरने सुरू केली 'बधाई दो'ची तयारी

हा एक रहस्यमय भयपट आहे. यासाठी आश्यक वातावरण निर्मिती चित्रपटात करण्यात आल्याचे ट्रेलरवरून दिसते. दुर्गामती हा एक वेगवान थ्रिलर चित्रपट आहे. केप ऑफ गुड फिल्म्स या निर्मिती संस्थेसाठी भूषण कुमार, क्रिशन कुमार आणि विक्रम मल्होत्रा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा - 'दुर्गावती'मधील काम उत्साह आणि भीती वाढवणारे - भूमी पेडणेकर

या चित्रपटात भूमी पेडणेकरसह अशर्द वारसी, जिशू सेनगुप्ता, माही गिल आणि करण कापडिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ११ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर प्रसारित होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.