महाभारतातील सहावा पांडव म्हणजे कर्ण. तो तसा दुर्लक्षितच राहिला. अर्जुनाएवढीच गुणवत्ता असूनही त्याचा उदोउदो कधी झाला नाही. महाभारत हे महाकाव्य अनेकांनी छोट्या आणि मोठ्या पडद्यावर, चितारण्याचा प्रयत्न केला. भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय फिल्म मेकर्सनी महाभारत आपापल्यापरीने उभं केले. परंतु कर्णाला पृष्ठभागी ठेऊन कोणतीही कलाकृती झाल्याचे ऐकिवात नाही. आता निर्माते वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख आणि जॅकी भगनानी यांनी हे 'कर्ण-धनुष्य' उचलण्याचे ठरविले आहे. सूर्यपुत्र कर्णाला मध्यवर्ती भूमिकेत ठेऊन ते सूर्यपुत्र महावीर कर्ण चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल तसेच विषयाचे बारकावे आणि अप्रतिम दृष्यमानाता या चित्रपटाची खासियत असेल. भारतीय सिनेमात प्रथमच महाभारताची भव्यता प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.
हेही वाचा - रेस्टॉरंटमधून बाहेर पडणाऱ्या दीपिका पदुकोणची फॅनने खेचली पर्स