मुंबई - अभिनेता टायगर श्रॉफने बुधवारी आपल्या आगामी 'कॅसानोवा' या गाण्याचा पहिला लूक शेअर केला. टायगरने गेल्या वर्षी 'अनबिलीवेबल' ट्रॅकद्वारे गाण्याची सुरुवात केली होती. डॅनियल ग्लाविन, केविन पाबन आणि अवितेश श्रीवास्तव यांनी या गाण्याला संगीत दिले होते.
टायगरने इन्स्टाग्रामवर या फ्रेश गाण्याचा १५ सेकंदाची एक झलक चाहत्यांसाठी शेअर केली आहे. हे गाणे रेकॉर्ड रण्यासाठी ज्या चाहत्यांनी त्याला प्रोत्साहन दिले त्या सर्वांचे त्याने आभार मानले आहेत.
![Tiger Shroff](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10138583_tigar.jpg)
"मी गायलेल्या माझ्या दुसर्या गाण्याचा फर्स्ट लूर शेअर करण्यास मी उत्सुक आहे. तुमचे प्रेम आणि समर्थन यामुळे असे गाणे पुन्हा करण्याचे मला धैर्य मिळाले आहे. हे गाणे आपल्याला आवडेल अशी अपेक्षा आहे,'' असे त्याने गाण्याच्या टीझरसोबत लिहिले आहे.
हेही वाचा - तापसी पन्नूच्या 'रश्मी रॉकेट' सिनेमाच्या शूटिंगची गुजरातमध्ये तयारी
टायगर श्रॉफ आगामी 'गणपथ' या चित्रपटात काम केले आहे. यावर्षी या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात होईल. हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट असून यात टायगर बॉक्सरची भूमिका साकारणार आहे.
हेही वाचा - सोहेल, अरबाज आणि निर्वाण खान क्वारंटाइनमध्ये, कायदा मोडल्या प्रकरणी गुन्हा दाखल