मुंबई - अॅक्शन स्टार टायगर श्रॉफचा 'गणपत' हा आजवरचा सर्वात जबरदस्त अॅक्शन थ्रिलर चित्रपट चर्चेचा विषय बनला आहे. यात टायगरसोबत कोण अभिनेत्री काम करणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. याचा उलगडा निर्माते करण्यास तयार झाले आहेत.
'गणपत' चित्रपटात कोण अभिनेत्री असेल याची उत्सुकता ताणवण्यासाठी टायगरने चाहत्यांना संदेश दिला आहे. मंगळवारी सकाळी त्याने सोशल मीडियावर एक ट्विट केलंय. यात तो म्हणतो, "सुना है मुड़ने वाली है कल सुबह ठीक 10:40 को", असे लिहित त्याने नायिका कोण असेल हे उद्या कळेल असे म्हटलंय.
चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक विकास बहल यांनी यापूर्वी सांगितले होते की आजवर प्रेक्षकांनी पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपटात काम करण्यास तो उत्सुक आहे. या चित्रपटातील टायगर श्रॉफची भूमिका 'न भूतो न भविष्यति' अशी असल्याचेही तो म्हणाला होता.
टायगरनेही म्हटले होते की चित्रपटातील स्क्रिप्ट, स्केल आणि व्यक्तिरेखा यामुळे 'गणपत' हा चित्रपट यापूर्वी काम केलेल्या सर्व चित्रपटाहून वेगळा आहे.
जॅकी भगनानी निर्मित गणपत हा चित्रपट फ्रेंचायझीचा पहिला चित्रपट म्हणून ओळखला जात आहे. या चित्रपटाचे २०२१ च्या मध्यात शूट सुरू होईल. अॅक्शन पॅक असलेला हा चित्रपट २०२२ मध्ये थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
हेही वाचा - प्रपोज डे 2021 : बॉलिवूड स्टार्सच्या रिअल-लाइफ प्रपोज स्टोरीज