ETV Bharat / sitara

तुझ्यासाठी काहीचं अशक्य नाही, तू पुन्हा दाखवून दिलं; टायगरनं केलं हृतिकच्या सुपर ३०चं कौतुक - biopic

तुझ्यासाठी काहीच अशक्य नाही, हे तू आज पुन्हा दाखवून दिलं, असं म्हणत टायगरनं हृतिकला शुभेच्छा दिल्या आहेत. तर प्रेक्षकांनाही त्याने हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.

टायगरनं केलं हृतिकच्या सुपर ३०चं कौतुक
author img

By

Published : Jul 13, 2019, 6:17 PM IST

मुंबई - अॅक्शन आणि रोमँटिक चित्रपटांसाठी ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशन नुकताच बायोपिकमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित असणारा हा सुपर ३० चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटातील हृतिकच्या अभिनयाचं अनेक कलाकारांनी कौतुक केलं आहे. यात टायगर श्रॉफचाही समावेश आहे. टायगरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. तुझ्यासाठी काहीच अशक्य नाही, हे तू आज पुन्हा दाखवून दिलं, असं म्हणत टायगरनं हृतिकला शुभेच्छा दिल्या आहेत. तर प्रेक्षकांनाही त्याने हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.

हृतिकनं एका सर्वोत्तम व्यक्तीकडून या शुभेच्छा आल्या असल्याचं म्हणत टायगरचे आभार मानले आहेत. दरम्यान सुपर ३० चित्रपटाचं दिग्दर्शन विकास बहलनं केलं असून रिलायन्स एन्टटेंन्मेंट आणि फँटम फिल्म्सच्या अंतर्गत चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ११.८३ कोटींचा गल्ला जमवला आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.