मुंबई - बॉलिवूडचा अॅक्शन हिरो म्हणून आज अभिनेता टायगर श्रॉफ लोकप्रिय आहे. त्याच्या दमदार स्टंट्सची झलक त्याच्या प्रत्येक चित्रपटात पाहायला मिळते. बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज म्हणजे ६ मार्चला अभिनेता टायगर श्रॉफचा 'बागी ३' हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता होती. त्याच्या आईने टायगरच्या बालपणीचा फोटो शेअर करुन त्याची खूप प्रशंसा केली आहे.
टायगर हा बालपणापासूनच अतिशय क्यूट असल्याचा अंदाज त्याचा हा फोटो पाहून येतो. टायगरची आई आयेशा श्रॉफ यांनी टायगरचा हा फोटो शेअर करुन त्याच्या 'बागी ३'साठी खूप शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच चाहत्यांनाही हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहण्याचे आवाहन केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -मुंबईत 'बागी ३'च्या विशाल होर्डिंगचं टायगरने केलं उद्घाटन
टायगरने 'हिरोपंती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. या चित्रपटातच त्याच्या अॅक्शनची झलक पाहायला मिळाली होती. त्यानंतर एकापाठोएक त्याने हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. मागच्या वर्षी त्याने हृतिक रोशनसोबत 'वॉर' चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचले आहेत.
आता 'बागी' आणि 'बागी २'च्या यशानंतर 'बागी ३' ची प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. पहिल्या भागात टायगरसोबत श्रद्धा कपूर दिसली होती. तर, दुसऱ्या भागात दिशा पाटणीची मुख्य भूमिका होती. आता तिसऱ्या भागात पुन्हा एकदा श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका आहे. यासोबतच अभिनेता रितेश देशमुख आणि अंकिता लोखंडे देखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवतो, हे पाहणं महत्वाचं आहे.
हेही वाचा -अवघ्या २ तासात लिहिलं 'लोका' गाणं, हनी सिंगने उलगडले खास किस्से
लवकरच टायगर 'हिरोपंती २' मध्येही मुख्य भूमिका साकारणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा फर्स्ट लुकही प्रदर्शित झाला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">