ETV Bharat / sitara

रहस्य, भीती व थराराने परिपूर्ण अश्या ‘डिबुक : द कर्स इज रियल’चे ट्रेलर झाले अनावरीत!

author img

By

Published : Oct 21, 2021, 5:21 PM IST

अमेझॉन प्राइम व्हिडिओने बहुप्रतीक्षित रहस्यमय- थरारपट 'डिबुक – द कर्स इज रियल' या सिनेमाचे गुंतवून ठेवणारे ट्रेलर प्रदर्शित केले आणि नेटिझन्सनी त्याची स्तुती केली आहे. याचे दिग्दर्शक आणि लेखक जय के आहेत. हा सिनेमा २०१७ मध्ये आलेला मल्याळम रहस्यमय सिनेमा एझराचा अधिकृत रिमेक आहे. या सिनेमात इम्रान हाश्मी, निकिता दत्ता आणि मानव कौल प्रमुख भूमिकेत असून त्यांच्याबरोबर इमाउद्दीन शहा, डेन्झिल स्मिथ, अनिल जॉर्ज, बिजय आनंद, गौरव शर्मा आणि युरी सुरी हे कलाकार दिसतील.

‘डिबुक : द कर्स इज रियल’चे ट्रेलर झाले अनावरीत

लेखक दिग्दर्शक जय के यांचा हॉररपट ‘एझरा’ हा मल्याळम भाषेतील चित्रपट खूपच गाजला होता. आता ते त्याची हिंदी आवृत्ती घेऊन आले आहेत ज्यात इम्रान हाश्मी प्रमुख भूमिकेत दिसेल. चित्रपटाचे नाव ‘डिबुक : द कर्स इज रियल’ असून नावातूनच हॉरर झळकताना दिसतोय. नुकतेच एका दिमाखदार सोहळ्यात या चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले. अमेझॉन प्राइम व्हिडिओने बहुप्रतीक्षित रहस्यमय- थरारपट 'डिबुक – द कर्स इज रियल' या सिनेमाचे गुंतवून ठेवणारे ट्रेलर प्रदर्शित केले आणि नेटिझन्सनी त्याची स्तुती केली आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

टी- सीरीज आणि पॅनोरमा स्टुडिओज यांची एकत्रित निर्मिती असलेल्या आगामी अमेझॉन ओरिजनल सिनेमात इम्रान हाश्मी त्याच्या लोकप्रिय जॉनरच्या चित्रपटात दिसणार असून सोबत निकिता दत्ता व मानव कौल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. मॉरिशसच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या सिनेमात एका शापित बेटावर घडणारे भयंकर प्रसंग पाहायला मिळतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये एक विवाहित महिला प्राचीन ज्यूईश बॉक्स समजून डिबुक बॉक्स घरी घेऊन आल्यानंतर उद्भवणारे भयावह आणि विचित्र प्रसंग रंगविण्यात आले आहेत.

"हा सिनेमा अतिशय विचारपूर्वक, काही घाबरवणारे प्रसंग समाविष्ट करत उत्तम कथानकासह तयार करण्यात आला आहे. डिबुक हा माझा पहिला डिजिटल सिनेमा आहे आणि माझ्या आवडत्या प्रकारच्या भूमिकेसह स्ट्रीमिंग पार्टनर म्हणून अमेझॉन प्राइम व्हिडिओवर या प्रवासाची सुरुवात करत असल्याचा आनंद आहे", असे इम्रान हाश्मी म्हणला. तो पुढे म्हणाला की, "मला लहानपणापासूनच हॉरर चित्रपट आवडतात आणि मी बरेच हॉररपट केलेत. हा चित्रपट त्या सर्वांपेक्षा भिन्न आहे म्हणूनच तो सर्वांनी पाहावा असे मी आवाहन करेन.”

"डिबुकच्या माध्यमातून प्रेक्षकांना पूर्णपणे भीतीदायक सिनेमा पाहायला मिळेल आणि मी तुम्हाला खात्री देतो, की हा सिनेमा प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहील," असे दिग्दर्शक जय के. म्हणाले. "सिनेमाचं कथानक गुंतवून ठेवणारं आणि आतापर्यंत फार कधी पाहिला न गेलेला विषय मांडणारं आहे. सिनेमाच्या केंद्रस्थानी ज्युईश पौराणिक कथा आणि संस्कृती असून त्याची अस्सलता लक्षात घेत सिनेमा तयार करण्यात आला आहे. इम्रान, निकिता आणि मानव यांसारखे गुणी कलाकार सिनेमात असल्याचा मला खूप आनंद झाला असून त्यांनी कथेला पूर्ण न्याय दिला आहे."

डिबुकची निर्मिती टी- सीरीजचे भूषण कुमार आणि क्रिशन कुमार यांनी पॅनोरमा स्टुडिओजचे कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांच्या सहकार्याने केली आहे. दिग्दर्शक आणि लेखक जय के आहेत. हा सिनेमा २०१७ मध्ये आलेला मल्याळम रहस्यमय सिनेमा एझरा चा अधिकृत रिमेक आहे. या सिनेमात इम्रान हाश्मी, निकिता दत्ता आणि मानव कौल प्रमुख भूमिकेत असून त्यांच्याबरोबर इमाउद्दीन शहा, डेन्झिल स्मिथ, अनिल जॉर्ज, बिजय आनंद, गौरव शर्मा आणि युरी सुरी हे कलाकार दिसतील.

रहस्य, भीती व थराराने परिपूर्ण असलेला ‘डिबुक : द कर्स इज रियल’ येत्या २९ ऑक्टोबर ला प्रदर्शित होणार आहे, ऍमेझॉन प्राईम व्हिडीओ वर.

हेही वाचा - मराठी चित्रपट ‘जयंती’ने बॉलिवूड चित्रपट ‘अंतिम’ बरोबरचा टाळला प्रदर्शन क्लॅश!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.