‘जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा झोया अख्तर दिग्दर्शित अप्रतिम रोड-ट्रिप चित्रपट होता. तीन मित्र, ह्रितिक रोशन, अभय देओल आणि फरहान अख्तर यांच्या घट्ट आणि भावनिक मैत्रीतून घडणाऱ्या घटना वास्तविकतेने मांडण्यात आल्या होत्या. एका स्त्री दिग्दर्शिकेने पुरुषांच्या मानसिकतेला उत्तमरीत्या सादर केले होते. आता ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा' चा स्त्री-अवतार, बहुतेक, येऊ घातलाय. त्यातील स्त्रियांच्या मानसिकतेला एक पुरुष दिग्दर्शक सादर करणार आहे. मुलींच्या रोड-ट्रिप वर आधारित एका नवीन सिनेमाची घोषणा झालीय. 'जी ले जरा' असे नाव असलेल्या या चित्रपटात प्रियांका चोप्रा जोनास, कॅटरीना कैफ आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिकांत दिसतील.
-
Did someone say road trip? #JeeLeZaraa @priyankachopra #KatrinaKaif @aliaa08 @FarOutAkhtar #ZoyaAkhtar @kagtireema @ritesh_sid @tigerbabyfilms @chaimettoast pic.twitter.com/OOnP5m9xCi
— Excel Entertainment (@excelmovies) August 10, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Did someone say road trip? #JeeLeZaraa @priyankachopra #KatrinaKaif @aliaa08 @FarOutAkhtar #ZoyaAkhtar @kagtireema @ritesh_sid @tigerbabyfilms @chaimettoast pic.twitter.com/OOnP5m9xCi
— Excel Entertainment (@excelmovies) August 10, 2021Did someone say road trip? #JeeLeZaraa @priyankachopra #KatrinaKaif @aliaa08 @FarOutAkhtar #ZoyaAkhtar @kagtireema @ritesh_sid @tigerbabyfilms @chaimettoast pic.twitter.com/OOnP5m9xCi
— Excel Entertainment (@excelmovies) August 10, 2021
एक्सेल एंटरटेनमेंट आणि टाइगर बेबीद्वारा निर्मित व फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' चा प्रवास पुढच्या वर्षी सुरु होणार असून त्यासाठी बॉलिवूडच्या तीन सुंदर आणि टॅलेंटेड अभिनेत्री, प्रियांका चोपडा जोनास, कॅटरीना कैफ आणि आलिया भट्ट यांची निवड करण्यात आली आहे. त्या मुख्य भूमिकेत असल्यामुळे आणि एका वेगळ्या जॉनरचा चित्रपट करायला मिळत असल्यामुळे या तिघीही जाम खूष आहेत. 'दिल चाहता है' आणि 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' नंतर पुढचा रोड ट्रिप चित्रपट सादर करताना एक्सेल एंटरटेनमेंटच्या या जॉनरची कमान या वेळी मुली सांभाळणार आहेत.
यावर्षीची ही सर्वात मोठी आणि धमाकेदार घोषणा असून याचे लेखन जोया अख्तर, फरहान अख्तर आणि रीमा कागती यांनी केले आहे. रीमा कागती, जोया अख्तर, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर हे निर्मात्यांच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाबाबतची आणखी एक खास गोष्ट ही आहे की याचे दिग्दर्शन फरहान अख्तर करणार आहे.
गेली बरीच वर्षे ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा' ची महिला आवृत्तीची मागणी फॅन्सकडून केली जात होती आणि एक्सेल एंटरटेनमेंटने बॉलिवूडमध्ये वीस वर्षे पूर्ण करताना 'जी ले जरा'ची घोषणा केली आहे. टायगर बेबीच्या सहयोगाने हा चित्रपट बनत असून यामध्ये प्रियांका चोप्रा जोनास, कॅटरीना कैफ आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असणार आहेत आणि तो २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - टायगर श्रॉफचे पहिले हिंदी गाणे ‘वंदे मातरम’ जॅकी भगनानीने केले प्रदर्शित!