ETV Bharat / sitara

अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब'चा 125 कोटींचा धमाका

लॉकडाऊनमुळे चित्रपटांचे रिलीज थांबली आहेत. थिएटरच सुरू नसल्यामुळे या व्यवसायावर मोठा परिणाम झालाय. मात्र ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा रिलीज करण्याची नवी परंपरा अमिताभच्या गुलाबो सिताबोपासून सुरू होत आहे. अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब'च नक्की काय होणार याची चर्चा गेले काही दिवस सुरू होती. आता हा सस्पेन्स संपला असून या सिनेमाचे हक्क तब्बल 125 कोटी रुपयांना डिस्ने आणि हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मने विकत घेतले आहेत.

author img

By

Published : May 28, 2020, 7:26 PM IST

Akshay Kumar's Lakshmi Bomb movie
'लक्ष्मी बॉम्ब'चा 125 कोटींचा धमाका

अमिताभ आणि आयुष्यमानच्या 'गुलाबो सीताबो'चे हक्क अमेझॉनने खरेदी केल्यानंतर अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब'च नक्की काय होणार याची चर्चा गेले काही दिवस सुरू होती. हा सिनेमादेखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार, अशी माहिती पुढे येऊनदेखील पण नक्की ते कधी घडणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. मात्र आता हा सस्पेन्स संपला असून या सिनेमाचे हक्क तब्बल 125 कोटी रुपयांना डिस्ने आणि हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मने विकत घेतले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार आणि सिनेमाचा दिग्दर्शक राघव लॉरेन्स हे या ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत चर्चा करत होते. मात्र कोणताही समाधानकारक तोडगा निघत नव्हता. अक्षयचा सिनेमा म्हटलं, की बॉक्स ऑफिसवर तो निदान 100 कोटी तरी कमवणारच. मग अशावेळी कमी पैसे घेऊन हक्क का विकावे असा प्रश्न पडला होता. अखेर तडजोड करत 125 कोटी एवढी रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर झालेली ही सगळ्यात मोठी आणि महागडी डील म्हणून या व्यवहाराकडे पहिलं जात आहे.

Akshay Kumar's Lakshmi Bomb movie
'लक्ष्मी बॉम्ब'चा 125 कोटींचा धमाका

लक्ष्मी बॉम्ब या सिनेमात अक्षय एका तृतीयपंथी व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा सिनेमातील लूक रिलीज झाल्यापासून या सिनेमाची चर्चा आहे. अभिनेत्री कियारा अडवाणी ही या सिनेमात त्याच्यासोबत काम करताना दिसेल. सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं असल तरीही त्याच डबिंग, एडिट, साउंड मिक्सिंग, डीआय, व्हिएफएक्स अशी कामं अजूनही बाकी आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात सिनेमा जून महिन्याच्या अखेरीस ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल होईल अशी शक्यता आहे. अक्षयचा हा सिनेमा थेट ओटीटीवर रिलीज होत असल्याने त्यांच्या फॅन्सनी काहीशी नाराजी व्यक्त केली आहे. काही जणांनी आपल्या भावना ट्विटरवर व्यक्तदेखील केल्या आहेत. पण आता सगळं नक्की झाल्यामुळे त्यांचा देखील नाईलाज आहे. आता अक्कीचा सिनेमा डिजिटल प्लॅटफॉर्मवर काय धूम करतो, ते लक्ष्मी बॉम्बचा धमाका झाल्यावर कळेलच.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.