ETV Bharat / sitara

द काश्मीर फाइल्सचे बॉक्स ऑफिसवर वादळ, ५० कोटींचा आकडा पार

author img

By

Published : Mar 16, 2022, 5:24 PM IST

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा नवीन चित्रपट द काश्मीर फाइल्स बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व कामगिरी करीत आहे. ट्रेंडनुसार या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 50 कोटींचा आकडा पार केला आहे.

द काश्मीर फाइल्स
द काश्मीर फाइल्स

मुंबई - विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' बॉक्स ऑफिसवर अविरत कमाई करत आहे. अनुपम खेर मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने रिलीजच्या पाचव्या दिवशी 18 कोटींची कमाई करून 50 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

भारतीय चित्रपट समीक्षक आणि व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन शेअर केले आहे. पहिल्या दिवशी ३.५५ कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने शनिवारी ८.५० कोटी रुपयांची कमाई केली. रविवारी आणि सोमवारी या चित्रपटाने अनुक्रमे 15.10 कोटी आणि 15.05 कोटी रुपयांची कमाई करत आणखी उच्चांक नोंदवला.

  • #TheKashmirFiles is a TSUNAMI at the #BO… FANTASTIC TRENDING, as footfalls, occupancy, numbers continue to soar… Day 5 higher than *all* previous days… BLOCKBUSTER... Fri 3.55 cr, Sat 8.50 cr, Sun 15.10 cr, Mon 15.05 cr, Tue 18 cr. Total: ₹ 60.20 cr. #India biz. pic.twitter.com/uaDH3ooVsO

    — taran adarsh (@taran_adarsh) March 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मंगळवारी चित्रपटाने 18 कोटी रुपयांची कमाई केली आणि त्याची एकूण कमाई 60.20 कोटी रुपये झाली. आठवड्याच्या दिवसातील या दुहेरी अंकी आकड्याने मागील बॉलिवूड चित्रपटांनी तयार केलेले महामारीनंतरचे बॉक्स ऑफिसवरील विक्रम मोडले आहेत.

Day 5 [Tuesday] Biz: TOP SCORERS [post pandemic times]...
1. #TheKashmirFiles: ₹ 18 cr
2. #Sooryavanshi: ₹ 11.22 cr
3. #GangubaiKathiawadi: ₹ 10.01 cr
4. #83TheFilm: ₹ 6.70 cr#Hindi films. #India biz.

Note:#Tanhaji: ₹ 15.28 cr#Uri: ₹ 9.57 cr
[Pre-#Covid times] pic.twitter.com/VejmaRWGdB

— taran adarsh (@taran_adarsh) March 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या जबरदस्त परफॉर्मन्समुळे आगामी अक्षय कुमार-स्टारर बच्चन पांडेच्या कलेक्शनवर परिणाम होऊ शकतो. जर काश्मिर फाइल्सकडे सध्या असलेल्या स्क्रीन्सची संख्या कायम राहिली तर बच्चन पांडेच्या व्यवसायाला गंभीर नुकसान पोहोचू शकते, असे व्यापारी पंडितांना वाटते.

1990 मध्ये काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराभोवती फिरणारी काश्मीर फाइल्स चित्रपटामध्ये अनुपम खेर, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि इतर कलाकार आहेत. हा चित्रपट उत्तर प्रदेश, त्रिपुरा, गोवा, हरियाणा आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये करमुक्त घोषित करण्यात आला आहे.

हेही वाचा - 'गॉडफादर'मध्ये चिरंजीवीसोबत साऊथमध्ये एन्ट्री करणार सलमान खान

मुंबई - विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' बॉक्स ऑफिसवर अविरत कमाई करत आहे. अनुपम खेर मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने रिलीजच्या पाचव्या दिवशी 18 कोटींची कमाई करून 50 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

भारतीय चित्रपट समीक्षक आणि व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन शेअर केले आहे. पहिल्या दिवशी ३.५५ कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने शनिवारी ८.५० कोटी रुपयांची कमाई केली. रविवारी आणि सोमवारी या चित्रपटाने अनुक्रमे 15.10 कोटी आणि 15.05 कोटी रुपयांची कमाई करत आणखी उच्चांक नोंदवला.

  • #TheKashmirFiles is a TSUNAMI at the #BO… FANTASTIC TRENDING, as footfalls, occupancy, numbers continue to soar… Day 5 higher than *all* previous days… BLOCKBUSTER... Fri 3.55 cr, Sat 8.50 cr, Sun 15.10 cr, Mon 15.05 cr, Tue 18 cr. Total: ₹ 60.20 cr. #India biz. pic.twitter.com/uaDH3ooVsO

    — taran adarsh (@taran_adarsh) March 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मंगळवारी चित्रपटाने 18 कोटी रुपयांची कमाई केली आणि त्याची एकूण कमाई 60.20 कोटी रुपये झाली. आठवड्याच्या दिवसातील या दुहेरी अंकी आकड्याने मागील बॉलिवूड चित्रपटांनी तयार केलेले महामारीनंतरचे बॉक्स ऑफिसवरील विक्रम मोडले आहेत.

बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या जबरदस्त परफॉर्मन्समुळे आगामी अक्षय कुमार-स्टारर बच्चन पांडेच्या कलेक्शनवर परिणाम होऊ शकतो. जर काश्मिर फाइल्सकडे सध्या असलेल्या स्क्रीन्सची संख्या कायम राहिली तर बच्चन पांडेच्या व्यवसायाला गंभीर नुकसान पोहोचू शकते, असे व्यापारी पंडितांना वाटते.

1990 मध्ये काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराभोवती फिरणारी काश्मीर फाइल्स चित्रपटामध्ये अनुपम खेर, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि इतर कलाकार आहेत. हा चित्रपट उत्तर प्रदेश, त्रिपुरा, गोवा, हरियाणा आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये करमुक्त घोषित करण्यात आला आहे.

हेही वाचा - 'गॉडफादर'मध्ये चिरंजीवीसोबत साऊथमध्ये एन्ट्री करणार सलमान खान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.