मुंबई - चित्रपट निर्माता विवेक अग्निहोत्रीचा नुकताच रिलीज झालेला द काश्मीर फाइल्स बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण करीत आहे. ट्रेड रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमारचा बच्चन पांडे रिलीज होऊनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार चालत आहे. रिलीजच्या 8 व्या दिवशी द काश्मीर फाइल्स ( The Kashmir Files ) ने इतिहास रचला आहे कारण चित्रपटाचा व्यवसाय बाहुबली 2 च्या बरोबरीने आहे.
-
#TheKashmirFiles creates HISTORY… *Day 8* of #TKF [₹ 19.15 cr] is AT PAR with #Baahubali2 [₹ 19.75 cr] and HIGHER THAN #Dangal [₹ 18.59 cr], the two ICONIC HITS… #TKF is now in august company of ALL TIME BLOCKBUSTERS… [Week 2] Fri 19.15 cr. Total: ₹ 116.45 cr. #India biz. pic.twitter.com/sjLWXV78J9
— taran adarsh (@taran_adarsh) March 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#TheKashmirFiles creates HISTORY… *Day 8* of #TKF [₹ 19.15 cr] is AT PAR with #Baahubali2 [₹ 19.75 cr] and HIGHER THAN #Dangal [₹ 18.59 cr], the two ICONIC HITS… #TKF is now in august company of ALL TIME BLOCKBUSTERS… [Week 2] Fri 19.15 cr. Total: ₹ 116.45 cr. #India biz. pic.twitter.com/sjLWXV78J9
— taran adarsh (@taran_adarsh) March 19, 2022#TheKashmirFiles creates HISTORY… *Day 8* of #TKF [₹ 19.15 cr] is AT PAR with #Baahubali2 [₹ 19.75 cr] and HIGHER THAN #Dangal [₹ 18.59 cr], the two ICONIC HITS… #TKF is now in august company of ALL TIME BLOCKBUSTERS… [Week 2] Fri 19.15 cr. Total: ₹ 116.45 cr. #India biz. pic.twitter.com/sjLWXV78J9
— taran adarsh (@taran_adarsh) March 19, 2022
व्यापार तज्ज्ञ तरण आदर्श यांनी काश्मीर फाइल्स बॉक्स ऑफिस रिपोर्टवर नवीन अपडेट शेअर केले आहे. त्यांच्या ट्विटर हँडलवर तरणने लिहिले, "द काश्मीर फाइल्सने इतिहास घडवला... रिलीजच्या आठव्या दिवशी चित्रपटाने १९.१५ कोटीचा व्यवसाय केला. बाहुबली २ चित्रपटाने आठव्या दिवशी १९.७५ कोटी कमावले होते तर दंगल चित्रपटाचा व्यवसाय १८.५९ कोटी इतका होता. द काश्मीर फाईल चित्रपट आता ऑल टाईम ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत समाविष्ठ झाला आहे. चित्रपटाची एकूण कमाई ११६.४५ कोटी इतकी झाली आहे.''
अभूतपूर्व प्रतिसादानंतर चित्रपटाचे निर्माते तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेमध्ये काश्मीर फाइल्स डब करत आहेत. बॉक्स ऑफिसवर आपली विजयी मालिका सुरू ठेवत, अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी यांचा समावेश असलेल्या काश्मीर फाईल्सने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात रु. 100 कोटी क्लबमध्ये स्थान मिळवले आहे.
1990 मधील काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराभोवती फिरणारी काश्मीर फाइल्स या चित्रपटाची कथा 11 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाली होती. हा चित्रपट उत्तर प्रदेश, त्रिपुरा, गोवा, हरियाणा आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये करमुक्त घोषित करण्यात आला आहे.
हेही वाचा - Vivek Agnihotri Y security : 'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना 'वाय' श्रेणीची सुरक्षा