अभिनेता कार्तिक आर्यनच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. हंसल मेहता दिग्दर्शन करीत असलेल्या कॅप्टन इंडिया या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून यात मुख्य भूमिका कार्तिक आर्यन साकारणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. 'अॅन ऑर्डेनरी मॅन, अॅन एक्स्ट्रऑर्डेनरी मिशन' अशी पोस्टवर बाय लाईन देण्यात आली आहे.
-
KARTIK AARYAN - HANSAL MEHTA TEAM UP... #KartikAaryan to star in #CaptainIndia... Directed by #HansalMehta... Produced by #RonnieScrewvala and #HarmanBaweja... Starts early next year... #FirstLook POSTER... pic.twitter.com/4v4PvMDibB
— taran adarsh (@taran_adarsh) July 23, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">KARTIK AARYAN - HANSAL MEHTA TEAM UP... #KartikAaryan to star in #CaptainIndia... Directed by #HansalMehta... Produced by #RonnieScrewvala and #HarmanBaweja... Starts early next year... #FirstLook POSTER... pic.twitter.com/4v4PvMDibB
— taran adarsh (@taran_adarsh) July 23, 2021KARTIK AARYAN - HANSAL MEHTA TEAM UP... #KartikAaryan to star in #CaptainIndia... Directed by #HansalMehta... Produced by #RonnieScrewvala and #HarmanBaweja... Starts early next year... #FirstLook POSTER... pic.twitter.com/4v4PvMDibB
— taran adarsh (@taran_adarsh) July 23, 2021
आरएसव्हीपी आणि बावेजा स्टुडिओची निर्मिती असलेल्या या सिनेमात कार्तिक आर्यन पायलटची भूमिका साकारताना दिसणार आहे. रॉनी स्क्रूवाला आणि हरमन बावेजा या चित्रपटाचे निर्माते असतील. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी कॅप्टन इंडियाचे पहिले पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे.
या चित्रपटाची कथा युद्धातून लोकांची सुखरुप सुटका करण्याच्या मिशनबद्दलची आहे. एक आक्रमक, साहसी भूमिकेत या सिनेमात कार्तिक दिसणार आहे. अलिकडे करण जोहरसह अनेक चित्रपटातून कार्तिक आर्यनची गच्छंती झाली होती. त्यामुळे त्यच्या भविष्याबद्दलची चिंता चाहत्यांना सतावत होती. अशा काळातच कार्तिकच्या नव्या सिनेमाची घोषणा झाल्यामुळे चाहते सुखावले असतील हे नक्की.
हेही वाचा - शिल्पा शेट्टीच्या घरी पोहोचले मुंबई पोलीस.. अभिनेत्रीने पहिल्यांदाच सोडले मौन, म्हणाली..