ETV Bharat / sitara

६७वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : 'छिछोरे' सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट; तर मराठीमध्ये 'बार्डो'ची बाजी

६७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. यात सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून 'छिछोरे'ने बाजी मारली. तर, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून 'बार्डो'ची निवड करण्यात आली. दरवर्षी तीन मे रोजी या पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. मात्र, कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता...

author img

By

Published : Mar 22, 2021, 5:33 PM IST

The 67th National Film Awards: Nitesh Tiwari's Chhichhore wins Best Hindi Film award
६७वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : 'छिछोरे' सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट; तर मराठीमध्ये 'बार्डो'ची बाजी

नवी दिल्ली : ६७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. यात सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून 'छिछोरे'ने बाजी मारली. तर, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून 'बार्डो'ची निवड करण्यात आली. दरवर्षी तीन मे रोजी या पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. मात्र, कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता.

यावर्षी फीचर फिल्म गटामध्ये ४६१ चित्रपट, तर नॉन-फीचर फिल्म गटामध्ये २२० चित्रपटांचा समावेश होता. तर, सर्वात जास्त चित्रपटस्नेही राज्याच्या शर्यतीत १३ राज्यांचा समावेश होता.

कंगना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर धनुष-मनोज सर्वोत्कृष्ट अभिनेते..

The 67th National Film Awards: Nitesh Tiwari's Chhichhore wins Best Hindi Film award
कंगना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर धनुष-मनोज सर्वोत्कृष्ट अभिनेते..

कंगना रणौतला 'मणिकर्णिका' आणि 'पंगा' या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला. तर, मनोज बाजपेयीला 'भोसले' या चित्रपटासाठी, आणि तमिळ अभिनेता धनुषला 'असुरन' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

यासोबत इतर प्रकारातील पुरस्कार पुढीलप्रमाणे -

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती) - सोहिनी चट्टोपाध्याय
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - विजय सेतुपती (सुपर डिलक्स)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - पल्लवी जोशी (द ताश्कंद फाईल्स)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - बी. प्राक (तेरी मिट्टी- केसरी)
  • सर्वोत्कृष्ट सामाजिक हक्कांवर आधारित चित्रपट- होली राईट्स (हिंदी), लाडली (हिंदी)
  • सर्वोत्कृष्ट पर्यावरण विषयक चित्रपट- द स्टॉर्क सेवियर्स
  • सर्वोत्कृष्ट चित्रपटस्नेही राज्य - सिक्कीम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.