मुंबई - 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाची निर्मिती हिंदीत झालेली असली तरी हा चित्रपट दाक्षिणात्य भाषांमधूनही रिलीज करण्यात येणार आहे. याची सुरूवात तेलुगु भाषेपासून झाली आहे. अभिनेत्री आलिया भट्टने एका व्हिडिओ आवानाच्या माध्यमातून हा चित्रपटाचा टिझर रिलीज होणार असल्याचे सांगितले आहे.
'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाचा तेलुगु टिझर दाक्षिणात्य पॉवर स्टार अशी ओळख असलेल्या पवन कल्याणच्या 'वकिल साब' या चित्रपटाच्या रिलीजपासून होणार आहे. 'वकिल साब' हा चित्रपट शुक्रवारी ९ एप्रिल रोजी सर्वत्र रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्यावेळी 'गंगूबाई काठियावाडी'चा तेलुगु टिझर रिलीज होईल.
-
#GANGUBAIKATHIAWADI #TELUGU TEASER WITH #VAKEELSAAB... #GangubaiKathiawadi - starring #AliaBhatt, with #AjayDevgn essaying a pivotal character - will also release in #Telugu... In fact, the #Telugu teaser will be released with #PawanKalyan's #VakeelSaab. #GangubaiInTelugu pic.twitter.com/6WTFVHaa1N
— taran adarsh (@taran_adarsh) April 8, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#GANGUBAIKATHIAWADI #TELUGU TEASER WITH #VAKEELSAAB... #GangubaiKathiawadi - starring #AliaBhatt, with #AjayDevgn essaying a pivotal character - will also release in #Telugu... In fact, the #Telugu teaser will be released with #PawanKalyan's #VakeelSaab. #GangubaiInTelugu pic.twitter.com/6WTFVHaa1N
— taran adarsh (@taran_adarsh) April 8, 2021#GANGUBAIKATHIAWADI #TELUGU TEASER WITH #VAKEELSAAB... #GangubaiKathiawadi - starring #AliaBhatt, with #AjayDevgn essaying a pivotal character - will also release in #Telugu... In fact, the #Telugu teaser will be released with #PawanKalyan's #VakeelSaab. #GangubaiInTelugu pic.twitter.com/6WTFVHaa1N
— taran adarsh (@taran_adarsh) April 8, 2021
हेही वाचा - पवन कल्याणने 'वकिल साब'चे शुटिंग केले पूर्ण
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर आलिया भट्टचा व्हिडिओ शेअर केला असून तेलुगु टिझरबद्दल माहिती दिली आहे.
'गंगूबाई काठियावाडी'ची कथा कामठीपुरा येथील एका वेश्यागृहातील मॅडम गंगूबाई कोठेवलीच्या जीवनाभोवती फिरली आहे आणि हुसेन जैदीच्या मुंबईच्या माफिया क्वीन्सच्या पुस्तकाच्या एका अध्यायावर आधारित आहे. या चित्रपटात आलियाशिवाय अजय देवगण आणि विक्रांत मस्सी देखील आहेत.
हेही वाचा - 'गंगूबाई काठीयावाडी' टिझर : 'कुमारी आपने छोडा नही और श्रीमती किसीने बनाया नहीं'