मुंबई - प्रसाद ओक अभिनयापाठोपाठ आता दिग्दर्शन श्रेत्रातही सक्रिय झाला आहे. लवकरच तो आपल्या दिग्दर्शनात तयार होणारा दुसरा 'हिरकणी' हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासातील कथा सांगताना हिरकणी या धाडसी आईची गाथा हमखास ऐकायला मिळते. हिच कथा या सिनेमातून दाखवली जाणार आहे.
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. यानंतर आता प्रसाद ओकने या चित्रपटातील पहिल्या गाण्याची टीझर शेअर केला आहे. ९ कलाकार... ६ लोककलांमधून... छत्रपती शिवरायांना देणार मानाचा मुजरा...शिवराज्याभिषेक गीत येत आहे उद्या, असं त्यानं टीझरला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या सिनेमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच २४ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘कच्चा लिंबू’ या मराठी चित्रपटातून प्रसादने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. अशात आता त्याचा हिरकणी चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.