मुंबई - अभिनेता अजय देवगण, सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'तान्हाजी - द अनसंग वॉरियर' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड सुरूच आहे. पहिल्या आठवड्यातच १०० कोटीचा आकडा गाठण्यात चित्रपटाला यश मिळालंय. सहव्या दिवशी चित्रपटाने १६ कोटी रुपयांचा गल्ला जमवलाय.
'तान्हाजी - द अनसंग वॉरियर' चित्रपटाने सर्वाधिक कमाई केलेल्या बॉलिवूडच्या २० चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवलंय. उत्तर भारतात अपेक्षित कमाई झालेली नसली तरी महाराष्ट्रात सर्वाधिक कमाई सिनेमा करीत आहे. पहिल्या दिवशी १५.१० कोटी, दुसऱ्या दिवशी २०.५७ कोटी. चौथ्या दिवशी १३.७५ कोटी आमि पाचव्या दिवशी १५.२८ कोटींची कमाई झाली होती.
'तान्हाजी - द अनसंग वॉरियर' चित्रपटाला समिक्षकांनी फार गौरवले नव्हते. असे असले तरी प्रेक्षकांनी चित्रपटाला उचलून धरलंय. या चित्रपटात अजय देवगणसोबत काजोल, सैफ अली खान, पंकज त्रिपाठी आणि शरद केळकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
'तान्हाजी - द अनसंग वॉरियर' चित्रपट उत्तर प्रदेशात टॅक्स फ्री करण्यात आलाय. त्यापाठोपाठ हरियाणा सरकारनेही टॅक्स फ्रीचा निर्णय घेतला. आता महाराष्ट्रातही टॅक्स फ्री करावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.