हैदराबाद - अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिच्यावर हैदराबादमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी तिला डिस्चार्ज देण्यात आला असून ती पुढील काही दिवस घरी क्वारंटाइन असेल.
तमन्नाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. तिने एक सविस्तर निवेदन प्रसिद्ध केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
ती आपल्या निवेदनात म्हणते, ''मी आणि माझी टीम सेटवर सावधगिरी बाळगून होते. पण दुर्दैवाने गेल्या आठवड्यात मला थोडा ताप आला. त्यानंतर मी चाचणी केली असती ती कोरोना पॉझिटिव्ह आली. त्यानंतर मी स्वतःहून एका खासगी रुग्णालयात भरती झाले. तिथे तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत माझ्यावर उपचार झाले आणि सध्या मी बरी होऊन डिस्चार्ज घेतला आहे. हा आठवडा तणावाचा होता, मात्र मला आता बरे वाटत आहे. मला आशा वाटते की, या आजारातून उद्भवणाऱ्या या धोक्यातून मी पूर्णपणे बरे होईन. मला मिळालेल्या सल्ल्यानुसार सेल्फ क्वारंटाइन राहीन. सुरक्षित रहा, निरोगी रहा, चांगले रहा. "
अभिनेत्री तमन्ना आगामी हिंदी थ्रीलर फिल्म "अंधाधुन" च्या तेलुगू रीमेकमध्ये दिसणार आहे. तसेच ती नवाजुद्दीन सिद्दीकीच्या "बोले चुडियां" या चित्रपटातही काम करीत आहे.