मुंबईः अभिनेता ताहिर राज भसीनने अलीकडे शेअर केले की तो आमीर खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकीपासून प्रेरणा घेऊन काम करतो. त्यांनी आपल्यावर संस्कार केल्याचे तो मानतो. ताहिर म्हणाला की, मी ज्यांना माझे मेंटॉर मानतो ते दररोज माझ्यासोबत नसतात, पण त्यांनी दिलेले संस्कार माझ्यासोबत नेहमी असतात.
मर्दानी हा त्याचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाच्या रिलीजनंतर आमीर खानने त्याला दिलेला सल्ला आजही स्मरणात आहे.
याबद्दल बोलताना ताहिर म्हणाला, ''मर्दानी चित्रपटानंतर मला आमीर खान यांना भेटण्याची संधी मिळाली. तेव्हा छोट्याशा भेटीत तो मला म्हणाले की, कधीच घाई करु नको आणि संधी मिळवताना कधीही घाबरु नकोस.''
हेही वाचा - वाणी कपूर अन् आयुष्मान खुराना 'या' आगामी सिनेमात एकत्र दिसणार
'मंटो' चित्रपटात ताहिरला नवाजुद्दीनसोबत काम करण्याची संधी मिळाली. नवाजुद्दीनबद्दल बोलताना ताहिर म्हणाला, ''माझे सिनेमातील दुसरे मेंटॉर नवाजुद्दीन सिद्दीकी आहेत. मी त्यांच्यासोबत मंटो चित्रपटात काम केले होते. त्यांनी मला प्रेक्षकांना कधीही कमी लेखू नकोस असे शिकवले.''
बॉलिवूडमध्ये ताहिरला सहा वर्षे झाली. मर्दानी, मंटो आणि छिछोरे या सिनेमांमधून त्याने उत्तम भूमिका साकारल्या. लवकरच तो कबीर खानच्या ''83'' या चित्रपटात सुनिल गावस्कर यांची भूमिका साकारत आहे.