ETV Bharat / sitara

तापसी पन्नूच्या 'रश्मी रॉकेट' सिनेमाच्या शूटिंगची गुजरातमध्ये तयारी - 'रश्मी रॉकेट' चित्रपटाची कथा

अभिनेत्री तापसी पन्नूचा आगामी रश्मी रॉकेट चित्रपटाचे शुटिंग आता पूर्णत्वाकडे पोहोचले आहे. पुढील आठवड्यात सुटिंगची टीम अखेरच्या शेड्यूलसाठी गुजरातला रवाना होईल.

Taapsee Pannu
रश्मी रॉकेट
author img

By

Published : Jan 6, 2021, 2:16 PM IST

मुंबई - अभिनेत्री तापसी पन्नूची नव्या वर्षाची सुरुवात चांगली झाली असून ती 'रश्मी रॉकेट' या चित्रपटाचे शुटिंग संपवण्याच्या तयारीत आहे. काही दिवसातच या चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन सुरू होईल. ऑक्टोबर महिन्यात 'हसिन दिलरुबा' या चित्रपटाचे शुटिंग संपवल्यानंतर तिने रश्मी रॉकेटच्या शुटिंगला सुरूवात केली होती.

तापसी 'रश्मी रॉकेट' या चित्रपटात एथलिटची भूमिका करीत असून यासाठी तिने कठोर मेहनत घेतली आहे. एथिलिटसारखे शरीर बनवून तिने चित्रपटाच्या शुटिंगमध्ये सहभाग घेतला. आता या चित्रपटाच्या शेवटच्या शेड्यूलचे शुटिंग गुजरातमध्ये पार पडणार आहे.

वृत्तानुसार, 'रश्मी रॉकेट'चे दिग्दर्शक आकर्श खुराना एप्रिल २०२० मध्ये कच्छच्या रणामध्ये रश्मी रॉकेटचे शुटिंग सुरू करणार होते. परंतु कोरोनाची साथ सुरू झाल्यामुळे याचे वेळापत्रक बदलावे लागले. आता कच्छमध्ये शुटिंग करण्यासाठी परवानगी मिळाली असून चित्रपटाची टीम १४ दिवसांसाठी गुजरातला रवाना होईल.

'रश्मी रॉकेट' चित्रपटाची कथा

ही एका गावातील मुलीची गोष्ट आहे. वेगात धावण्यासाठी ईश्वराने तिला वरदान मिळाले आहे. या अतुलनीय क्षमतेमुळे गावकरी तिला रॉकेटच्या नावाने ओळखतात. जेव्हा तिला व्यावसायिकपणे आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते तेव्हा ती ही संधी तिच्या हातातून जाऊ देत नाही. फिनीश लाईनपर्यंत धावण्यात अनेक अडथळे आहेत याची तिला जाणीव होते. अ‍ॅथलेटिक स्पर्धेसारखी दिसणारी ही शर्यत, सन्मान, आदर आणि अगदी स्वतःच्या ओळखीसाठी वैयक्तिक लढाईत रुपांतरित होते.

हेही वाचा - हवाईदलाचे मिग-२९ अपघातग्रस्त; वैमानिकाला वाचवण्यात यश

'रश्मी रॉकेट' या चित्रपटाची कथा नंदा परियासामी, अनिरुद्ध गुहा आणि कनिका ढिल्लन यांनी लिहिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आकर्ष खुराना करणार आहेत.

हेही वाचा - सोहेल, अरबाज आणि निर्वाण खान क्वारंटाइनमध्ये, कायदा मोडल्या प्रकरणी गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.