ETV Bharat / sitara

'मर्दानी' म्हणणाऱ्या ट्रोलर्सना तापसी पन्नूने दिले चोख प्रत्युत्तर

आपल्यावर टीका करणाऱ्यांना उत्तरे देण्यास वस्ताद असल्याचे तापसी पन्नूने पुन्हा एकदा सिध्द केले आहे. बॉडी शेमींग ट्रोल बंद केल्याबद्दल चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

तापसी पन्नूने दिले चोख प्रत्युत्तर
तापसी पन्नूने दिले चोख प्रत्युत्तर
author img

By

Published : Sep 21, 2021, 3:45 PM IST

मुंबई - अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या शरीराला मर्दानी म्हणणाऱ्या ट्रोलर्सना दिलेल्या विनोदी प्रत्युत्तराने इंटरनेटवर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. टीका करणाऱ्यांचे तोंड बंद करण्यात आपण पटाईत असल्याचे तिने अनेकवेळा दाखवून दिलंय. सोमवारी, तिच्या बहुप्रतिक्षित 'रश्मी रॉकेट' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर, ट्विटरवरील एका प्रकाशन गृहाने तिचा फोटो पोस्ट केला होता. यात त्यांनी तिचा पाठमोरा फोटो पोस्ट करुन युजर्सना विचारले होते की ही अभिनेत्री कोण आहे सांगा.

पोस्टला ट्विटरेटीकडून अनेक कमेंट्स मिळाल्या, पण एका सोशल मीडिया यूजरने तापसीला ट्रोल केले आणि लिहिले, "ये मर्द की बॉडीवाली सिर्फ तापसी ही हो सकती है."

हे लक्षात येताच तापसीने युजरला उत्तर देताना लिहिले, मी इतकेच म्हणेन..हे वाक्य आठवणीत ठेवा आणि 23 सप्टेंबरपर्यंतची प्रतीक्षा करा. आणि अॅडव्हान्समध्ये धन्यवाद देते. मी या कौतुकासाठी खरोखरच खूप मेहनत केली आहे. बॉडी शेमिंग ट्रोलर्सची बोलती बंद केल्याबद्दल तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

तापसी पन्नूची मुख्य भूमिका असलेल्या 'रश्मी रॉकेट'च्या निर्मात्यांनी घोषणा केली की हा चित्रपट 15 ऑक्टोबर रोजी OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर प्रदर्शित केला जाईल. सोमवारी तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तापसीने चित्रपटाच्या पोस्टरसह रिलीजची तारीख शेअर केली.

हेही वाचा - रावणाचे उदात्तीकरण केल्याचा आरोप, शीर्षक बदलूनही 'भवाई'बद्दलचे नाटक सुरूच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.