ETV Bharat / sitara

‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर स्वप्नील जोशी बनला ‘पोस्टमन’!

author img

By

Published : May 3, 2021, 3:51 PM IST

‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर आता नवीन एन्ट्री होणार आहे ती म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अनिता दातेची. अनिता आता ‘चला हवा येऊ द्या’ च्या हास्यवीरांसोबत विनोद करताना दिसणार आहे. ह्या आठवड्यातील वैशिष्ट्य म्हणजे स्वप्नील जोशीने ‘पोस्टमन’ चा अवतार धारण केला आहे. त्याने वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव, ऑक्सिजन आणि राजकारणावर भाष्य करणारे पत्र वाचन केलं, तेव्हा तेथे उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले.

Swapnil Joshi becomes 'Postman'
स्वप्नील जोशी बनला ‘पोस्टमन

‘चला हवा येऊ द्या’ हा झी मराठीवरील विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत आहे. परंतु आता जवळपास सर्वच मराठी वाहिन्यांवर विनोदी प्रशासनाचे कार्यक्रम सुरु झाले असून मराठी प्रेक्षकांना विनोदातही वैविध्य पाहायला मिळतंय. त्यातील काही कार्यक्रम प्रेक्षकांना जास्त प्रमाणात आवडू लागले असल्यांनी सर्वांनीच आपापले कार्यक्रम अजूनही मनोरंजक करण्यासाठी निरनिराळे हातखंडे वापरण्यास सुरुवात केली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ ने महाराष्ट्रही सुपरस्टार आणि चॉकोलेट हिरो स्वप्नील जोशी ला त्यांच्या कार्यक्रमाचा हिस्सा करून घेतल्यामुळे त्यांच्या प्रेक्षक संख्येत वाढ झाली.

Swapnil Joshi becomes 'Postman'
‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर स्वप्नील जोशी

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय घेऊन नियमावली कठोर करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यामध्ये मालिका, सिनेमांच्या चित्रिकरणार पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे. त्यामुळे मनोरंजनाला ब्रेक लागू नये आणि प्रेक्षकांचं मनोरंजन अविरत सुरु राहावं म्हणून झी मराठीवरील मालिकांचं चित्रिकरण महाराष्ट्राबाहेरील राज्यात हलवावं लागलं आहे. सध्या ‘चला हवा येऊ द्या’ चं शूट जयपूर मध्ये सुरु आहे.

Swapnil Joshi becomes 'Postman'
‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर अनिता दाते

याच “हवा”च्या मंचावर आता नवीन एन्ट्री होणार आहे ती म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम आणि त्यातील ‘राधिका मसाले’ ची सर्वेसर्वा राधिका सुभेदार म्हणजेच अनिता दातेची. अनिता आता ‘चला हवा येऊ द्या’ च्या हास्यवीरांसोबत विनोद करताना दिसणार आहे.

Swapnil Joshi becomes 'Postman'
स्वप्नील जोशी बनला ‘पोस्टमन

तसेच ‘चला हवा येऊ द्या’ च्या ह्या आठवड्यातील वैशिष्ट्य म्हणजे स्वप्नील जोशीने ‘पोस्टमन’ चा अवतार धारण केला आहे. त्याने वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव, ऑक्सिजन आणि राजकारणावर भाष्य करणारे पत्र वाचन केलं, तेव्हा तेथे उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले. अनिता दातेची आता हास्यजनक बाजू प्रेक्षकांना बघायला मिळणार असून त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

हसता हसता डोळ्यात पाणी आणणारे 'चला हवा येऊ द्या' चे हे भाग ३ मे ते ५ मे रोजी झी मराठीवर प्रसारित होणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.