ETV Bharat / sitara

सुझान खान, वीर दाससह खुशी कपूरलाही कोरोनाची लागण - बॉलिवूड सेलेब्रिटींना कोरोनाची लागण

बॉलिवूड सेलिब्रिटी सुझान खान आणि वीर दास यांनी शेअर केले आहे की त्यांची COVID-19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान, दिवंगत सुपरस्टार श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूरलाही कोरोनाची लागण झाल्याची बातमीही ऑनलाइन समोर आली आहे.

तिसऱ्या लाटेत कोरोना पॉझिटिव्ह सेलेब्रिटी

author img

By

Published : Jan 11, 2022, 1:58 PM IST

मुंबई - हृतिक रोशनची माजी पत्नी आणि इंटिरियर डिझायनर सुझान खान, अभिनेता आणि स्टँड-अप कॉमिक वीर दास आणि बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर यांना कोविड-19 ची लागण झाली आहे.

मंगळवारी सुझानने इंस्टाग्रामवर सर्वांना तिच्या निदानाची माहिती दिली. "कोविड-19 ला 2 वर्षे चकमा दिल्यानंतर, 2022 यावर्षी जिद्दी ओमायक्रॉनने अखेर माझ्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये घुसखोरी केली. काल रात्री माझी चाचणी पॉझिटिव्ह आली. कृपया सुरक्षित रहा आणि स्वतःची काळजी घ्या. ही एक अतिशय संसर्गजन्य आजार आहे," असे तिने लिहिलंय.

कॉमेडियन-अभिनेता वीर दास याने सोमवारी रात्री शेअर केले की त्याटी कोविड-19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे आणि त्याला सौम्य लक्षणे आहेत.

त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर वीरने लिहिले, "बरोबर. माझी कोविड -19 साठीची टेस्ट सकारात्मक आली आहे. डोके दुखणे आणि घसा खवखवणे अशी सौम्य लक्षणे आहेत. गेल्या महिन्यात फक्त दोन लोकांच्या संपर्कात होतो आणि ते दोघेही निगेटिव्ह आहेत ही बाब चांगली आहे."

दरम्यान, जान्हवी कपूरची धाकटी बहीण खुशी कपूर हिला व्हायरसची लागण झाल्याचे अनेक मीडिया रिपोर्टमधून कळत आहे. दिवंगत सुपरस्टार श्रीदेवीच्या मुलीने अद्याप या बातमीची अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. परंतु वृत्तानुसार स्टार-किड होम क्वारंटाईनमध्ये आहे आणि बहीण जान्हवी आणि बोनी आता सोशल डिस्टन्स पाळत आहेत.

हेही वाचा - सामंथाने चाहत्यांना दिले 'कॅलरी बर्न'साठी फिटनेस चॅलेंज पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.